स्वत:च्या लग्नपत्रिका वाटताना झाला घात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST2022-04-09T05:00:00+5:302022-04-09T05:00:35+5:30
नवरगाव येथील जीवन पराते हे दुचाकीने स्वत:च्या लग्नाची पत्रिका तालुक्यातील सोनेरांगी व तळेगाव येथील नातेवाइकांना देत परत कूरखेडा - वडसा मार्गाने स्वगावाकडे जात हाेते. दरम्यान, आंधळी येथून विटा भरलेला ट्रॅक्टर (क्र. एम. एच. ३३ - व्ही १७४९) हा आंधळी फाट्यावर अचानक रस्त्यावर आला. यावेळी दुचाकी नियंत्रित न झाल्याने दुचाकीची ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले.

स्वत:च्या लग्नपत्रिका वाटताना झाला घात
लाेकमत न्यूज नेटवर्क
कूरखेडा : कूरखेडा-देसाईगंज मार्गावरील आंधळी फाट्यावर ट्रॅक्टर व दुचाकीची समोरासमोर धडक झाल्याने दुचाकीवरील दोन इसम गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ३.३० वाजता घडली.
अपघातात जीवन भाऊराव पराते (२७, रा. नवरगाव - सिंदेवाही) हा गंभीर जखमी आहे तर नीलेश निखारे (२९, रा. आष्टा - आरमोरी) याच्या पायाला दुखापत झाली आहे. नवरगाव येथील जीवन पराते हे दुचाकीने स्वत:च्या लग्नाची पत्रिका तालुक्यातील सोनेरांगी व तळेगाव येथील नातेवाइकांना देत परत कूरखेडा - वडसा मार्गाने स्वगावाकडे जात हाेते. दरम्यान, आंधळी येथून विटा भरलेला ट्रॅक्टर (क्र. एम. एच. ३३ - व्ही १७४९) हा आंधळी फाट्यावर अचानक रस्त्यावर आला. यावेळी दुचाकी नियंत्रित न झाल्याने दुचाकीची ट्रॅक्टरला धडक बसली. या अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झाले. त्यांना लगेच काळीपिवळी टॅक्सी चालकाने कूरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र जीवन पराते यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे. कूरखेडा पोलिसांनी घटनेची नोंद घेत ट्रॅक्टर व दुचाकी ताब्यात घेतली आहे.