रेगुंठासह १७ गावातील शेतकऱ्यांसाठी हाेणार सिंचनाची साेय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:36 IST2021-05-14T04:36:31+5:302021-05-14T04:36:31+5:30
उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, कार्यकारी अभियंता संतोष मेश्राम, सरपंच सतीश आत्राम, उपसरपंच श्रीनिवास ...

रेगुंठासह १७ गावातील शेतकऱ्यांसाठी हाेणार सिंचनाची साेय
उद्घाटनप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य भाग्यश्री आत्राम, युवा नेते ऋतुराज हलगेकर, कार्यकारी अभियंता संतोष मेश्राम, सरपंच सतीश आत्राम, उपसरपंच श्रीनिवास कडार्ला, सत्यनारायण परपटलावार, सतीश कडार्ला, अभियंता रवींद्र मेश्राम उपस्थित होते.
सर्वप्रथम भाग्यश्री आत्राम यांनी नारळ फोडून बांधकामाचे उद्घाटन केले. याप्रसंगी आ. धर्मरावबाबा आत्राम म्हणाले, शिक्षण, सिंचन, आरोग्य, ‘गाव तिथे बससेवा’ हे आपले व्हिजन व मिशन आहे. त्यादृष्टीने रेगुंठा उपसा जलसिंचनाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, लवकरच रेगुंठा व परिसरातील १७ गावांना पाण्याची सोय व लाभ मिळणार आहे. रेगुंठा जलउपसा सिंचनामुळे मुबलक पाणी व शेतात बारमाही पिके घेता येणार आहेत. याेजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतात विविध पिके घेतल्यास हा परिसर सुजलाम-सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. उद्घाटनप्रसंगी परिसरातील शेतकरी व नागरिक उपस्थित हाेते.
बाॅक्स
चार जलसिंचन याेजनांसाठी पाठपुरावा
अहेरी उपविभागात भरपूर प्रमाणात नद्या आहेत. परंतु त्यामानाने सिंचनाच्या साेयीसुविधा उपलब्ध नाहीत. उपविभागात सिंचनाची साेय निर्माण करण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न केले जात आहेत. रेगुंठा उपसा जलसिंचनासोबतच अहेरी विधानसभा क्षेत्रात पुन्हा चार उपसा जलसिंचनासाठी शासनस्तरावर मागणी व पाठपुरावा सुरू आहे. याेजना मंजूर झाल्यास अधिकाधिक क्षेत्र सिंचनाखाली येईल, असे आ. धर्मरावबाबा आत्राम यांनी सांगितले.
===Photopath===
130521\13gad_8_13052021_30.jpg
===Caption===
उद्घाटन करताना जि.प. सदस्य भाग्यश्री आत्राम, साेबत आ. धर्मरावबाबा आत्राम.