शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

'गोंडवाना'त गुणवाढीचा प्रकार ? परीक्षा भवनाला सील लावल्यानंतर संशय

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 14:26 IST

प्रशासनाकडून प्रचंड गोपनीयता : चंद्रपुरातील विद्यार्थ्यांची कंत्राटी कर्मचाऱ्यांशी सलगी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठातील पुनर्मूल्यांकन विभागाला 'सील' लावण्यात आले आहे. चंद्रपूर शहरातील एका नामांकित महाविद्यालयातील एका विषयाच्या उत्तरपत्रिकेत पुनर्मूल्यांकन प्रक्रियेदरम्यान गुणवाढीचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. दरम्यान, पुनर्मूल्यांकनासाठी प्राप्त झालेला एक पेपर विद्यापीठाच्या परीक्षा भवनातून गहाळ झाल्याची चर्चा विद्यापीठ परिसरात आहे. मात्र, याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडून प्रचंड गोपनीयता पाळली जात आहे.

गोंडवाना विद्यापीठात सध्या विविध विषयांच्या पेपर पुनर्मूल्यांकनाचे काम सुरू आहे. १२ फेब्रुवारीला गुणवाढीचा हा प्रकार उघडकीस आला. या प्रकारामुळे परीक्षा विभागाने पुनर्मूल्यांकनाचे काम काही कालावधीसाठी स्थगित केल्याची माहिती आहे.

चंद्रपुरातील एका महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांशी सलगी करून गुणवाढीचा प्रकार केल्याचे बोलले जात आहे. या प्रकारामुळे विद्यापीठाने या कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून हे काम काढून घेतले असून, आता तिथे विद्यापीठातील दोन कायम कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली. विद्यापीठाने संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांना विद्यापीठात बोलावून घेतले आणि घडलेल्या प्रकाराची माहिती दिल्याची चर्चाही विद्यापीठाच्या वर्तुळात आहे.

माध्यमांशी बोलणे अधिकाऱ्यांनी टाळले

या प्रकाराबाबत खातरजमा करण्यासाठी 'लोकमत'ने विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. प्रवीण पोटदुखे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. याच विभागाचे सहायक कुलसचिव रवींद्र जुनघरी यांच्याशी संपर्क केला असता, परीक्षेपूर्वीचे काम माझ्याकडे असते, मूल्यांकनाबाबत 'संचालक' यांना विचारणा करावी, असे त्यांनी सांगितले.

यापूर्वीही घडला होता गुणवाढीचा प्रकार

गोंडवाना विद्यापीठात सात ते आठ वर्षांपूर्वी उत्तरपत्रिका मूल्यांकन प्रक्रियेत गुणवाढीचा प्रकार उजेडात आला होता. त्यावेळी 'लोकमत'ने वृत्त प्रकाशित करून प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांवर कारवाई झाली होती.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीEducationशिक्षण