लोह खनिजाचे ट्रक उलटून चौघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2017 22:54 IST2017-11-06T22:54:41+5:302017-11-06T22:54:57+5:30
एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरून लोहखनिज घेऊन जात असलेले दोन ट्रक उलटून दोन्ही ट्रकचे चालक व क्लिनर असे चौघे जण जखमी झाले.

लोह खनिजाचे ट्रक उलटून चौघे जखमी
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी/एटापल्ली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडीवरून लोहखनिज घेऊन जात असलेले दोन ट्रक उलटून दोन्ही ट्रकचे चालक व क्लिनर असे चौघे जण जखमी झाले. सदर अपघात येलचिल गावाजवळ सोमवारी दुपारच्या सुमारास घडला.
एटापल्ली पहाडावरून शेकडो ट्रकांनी लोहखनिजाची वाहतूक केली जात आहे. सततच्या वाहतुकीमुळे रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडले आहेत. एटापल्ली मार्ग अरूंद सुध्दा आहे. त्यामुळे दोन ट्रक समोरासमोर आल्यास अडचण निर्माण होते. अशा परिस्थितीत वाहतूक सुरू आहे. जखमींना तत्काळ अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले असून एटापल्ली-अहेरी मार्गाची दुरूस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.