रक्तदानात पोलिसांसह महिलांचाही सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 05:00 IST2021-07-07T05:00:00+5:302021-07-07T05:00:27+5:30

या शिबिराचे उद्घाटन चामोर्शीचे ठाणेदार पो.निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयचे प्रा.डॉ. राजेंद्र झाडे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शेखर दोरखंडे, होप फाउंडेशनचे अध्यक्ष नागेश मादेशी, जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार उपस्थित होते. यावेळी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रक्तदानासाठी अनेक महिलाही सरसावल्या.

Involvement of women including police in blood donation | रक्तदानात पोलिसांसह महिलांचाही सहभाग

रक्तदानात पोलिसांसह महिलांचाही सहभाग

ठळक मुद्देचामोर्शीत लोकमतच्या रक्तदान महायज्ञात ३८ जणांचा पुढाकार

लाेकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : लोकमत समुहाने २ जुलैपासून सुरू केलेल्या रक्तदान महायज्ञात मंगळवारी येथील ग्रामीण रुग्णालयात झालेल्या रक्तदान शिबिरात ३८ रक्तदात्यांनी सहभागी होऊन प्रत्यक्ष रक्तदान केले. ‘लोकमत’ मित्रपरिवारासह पोलीस प्रशासन, लोकमत सखी मंच, होप फाउंडेशन, गणेश व दुर्गा मंडळांच्या सहकार्याने हे शिबिर घेण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन चामोर्शीचे ठाणेदार पो.निरीक्षक बिपिन शेवाळे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयचे प्रा.डॉ. राजेंद्र झाडे तर प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी शेखर दोरखंडे, होप फाउंडेशनचे अध्यक्ष नागेश मादेशी, जिल्हा परिषद सदस्य अतुल गण्यारपवार उपस्थित होते. यावेळी जवाहरलाल दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी रक्तदानासाठी अनेक महिलाही सरसावल्या. काहींना वैद्यकीय पात्रतेत बसत नसल्याने रक्तदानापासून वंचित राहावे लागले.
अतुल गण्यारपवार यांनी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे, असे आवाहन केले. सदर कार्यक्रमाला लोकमतचे जिल्हा कार्यालय प्रमुख डॉ.गणेश जैन, सखी मंचच्या जिल्हा संयोजिका रश्मी आखाडे उपस्थित होते. प्रास्ताविक होप फाउंडेशनचे अध्यक्ष नागेश मादेशी यांनी तर संचालन सखीमंचच्या सदस्य प्रा.डॉ.वंदना चौथाले यांनी व आभार रोशन थोरात यांनी मानले. या शिबिरासाठी लोकमत प्रतिनिधी लोमेश बुरांडे, घोटचे पांडुरंग कांबळे तसेच सखीमंचच्या तालुका संयोजिका सोनाली पालारपवार, सदस्य चेताली चांदेकर, वंदना चौथाले, वर्षा भांडरवार, रजनी मस्के, अमृता आइंचवार, स्नेहल खाडे, नयना सिडाम, अनिता बोकडे, माधुरी बर्लावार यांच्यासह चेतन गेडाम, करण शेटे, धनराज बारसागडे यांनी सहकार्य केले.

पाे.निरीक्षकांचे रक्तदान
या शिबिरासाठी चामोर्शी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. विशेष म्हणजे स्वत: पोलीस निरीक्षक बिपिन शेवाळे यांनीही रक्तदान करून आपल्या सहकाऱ्यांना यासाठी प्रोत्साहित केले. 

 

Web Title: Involvement of women including police in blood donation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.