पाणी सोडण्याच्या टाक्यामुळे अपघाताला निमंत्रण
By Admin | Updated: February 27, 2016 01:44 IST2016-02-27T01:44:56+5:302016-02-27T01:44:56+5:30
येथील आझाद चौकात के. के. महिला महाविद्यालयाच्या समोर पाणी सोडण्यासाठी टाका बांधण्यात आला आहे.

पाणी सोडण्याच्या टाक्यामुळे अपघाताला निमंत्रण
आरमोरी : येथील आझाद चौकात के. के. महिला महाविद्यालयाच्या समोर पाणी सोडण्यासाठी टाका बांधण्यात आला आहे. मात्र या टाक्यावर फरशी नसल्याने त्या ठिकाणी वाहनधारक कोसळून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहेत.
आझाद चौकाला पाणीपुरवठा करण्यासाठी या टाकीमध्ये असलेल्या व्हॉल्व्हमधून पाणी सोडले जाते. या ठिकाणी फरशी बसविण्यात आली होती. मात्र सदर फरशी निकृष्ट दर्जाची होती. त्यामध्ये लोखंडी सळाखीचा वापर करण्यात आला नव्हता. त्यामुळे ती काही दिवसातच तुटली. तेव्हापासून सदर टाका उघडाच आहे. (प्रतिनिधी)