शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
3
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
4
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
5
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
6
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
7
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
8
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
9
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
10
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
11
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
12
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
13
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
14
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
15
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
16
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
17
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ५ मे पासून 'या' भागांत ३० तास पाणीपुरवठा बंद; पाहा संपूर्ण यादी
18
Travel : मे महिन्याच्या उन्हातही अनुभवा डिसेंबरची थंडी! भारतातील 'या' थंडगार ठिकाणांना नक्की भेट द्या
19
पाकिस्तानचा 'डबल गेम', अमेरिकेच्या निर्बंधांना झुगारून इराणसाठी सुरू केले ६ व्यापारी भू-मार्ग
20
बंगालमध्ये त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास काँग्रेस ममता दीदींना पाठिंबा देणार? मल्लिकार्जुन खर्गे स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

नोकर भरतीची चौकशी करा

By admin | Updated: March 1, 2015 01:44 IST

गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात कार्यरत असताना प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके यांनी ३२ पदांची नोकर भरती करविली होती.

गडचिरोली : गडचिरोली एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पात कार्यरत असताना प्रकल्प अधिकारी दिगांबर मेंडके यांनी ३२ पदांची नोकर भरती करविली होती. या भरतीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर घोळ करून आर्थिक लाभ मिळविला. याबाबत तत्कालीन राज्य सरकारकडेही तक्रार करण्यात आली होती. परंतु मेंडके यांचे पाठीराखे सरकारमध्ये असल्याने या प्रकरणाची चौकशी न करता सदर भरती प्रकरणातील गैरव्यवहार दाबून टाकण्यात आला. मेंडके यांना सध्या शिष्यवृत्ती घोटाळा प्रकरणात गडचिरोली पोलिसांनी अटक केली आहे.पोलिसांनी मेंडके यांची याही प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी तक्रारकर्त्यांनी केली आहे. गडचिरोली प्रकल्पात दिगांबर मेंडके २०११ ते मे २०१४ या कालावधीत कार्यरत होते. याच काळात त्यांनी २०१२ मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्तपद भरती केली. या पद भरतीत मोठ्या प्रमाणावर नियमबाह्य काम करण्यात आले. उमेदवारांकडून पैसेही जमा केल्याच्या तक्रारी झाल्या. पात्र उमेदवाराची पहिली यादी कार्यालयाच्या बोर्डावर लावण्यात आली होती. त्यानंतर लगेच ती फाडून दुसरी लावण्यात आली. यात पैसे देणाऱ्या उमेदवाराचे नाव घालण्यात आले, असा आरोप तक्रारकर्ते किसन मानकर यांनी केला आहे. यासंदर्भात मानकर यांनी माहिती अधिकारात २१ एप्रिल २०१२ ला प्रकल्प कार्यालयाकडे माहिती मागितली. या कार्यालयाने २४ मे २०१२ पर्यंत मानकर यांना कार्यालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरती प्रक्रियेची माहितीच उपलब्ध करून दिली नाही. त्यानंतर २९ जून २०१२ ला चुकीची व खोटी माहिती प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिली. मेंडके यांच्या कार्यकाळात झालेल्या या भरती प्रक्रियेत एका मुक व बधीर असलेल्या उमेदवाराला तोंडी परीक्षेत २५ गुण देण्याचा धक्कादायक प्रकारही घडलेला आहे. मुकबधीर असलेल्या उमेदवाराची मौखीक परीक्षा घेतली कशी, हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला होता, यासंदर्भात तत्कालीन आदिवासी विकास मंत्र्यांकडेही तक्रार करण्यात आली होती. मात्र तत्कालीन आघाडी सरकारमध्ये मेंडके यांचे पाठीराखे मंत्री असल्याने सर्वसामान्य तक्रारकर्त्याच्या तक्रारीला न्याय मिळाला नाही, असे किसन मानकर यांनी म्हटले आहे. यासंदर्भात उमेदवारांची यादी मागण्यासाठी ३१ आॅगस्ट २०१२ ला अपीलीय अर्ज करण्यात आला. यावेळीही प्रकल्प अधिकारी मेंडके यांनी चुकीची माहिती मानकर यांना दिली. मेंडके यांच्या कार्यकाळात झालेल्या नोकर भरतीत कोट्यवधी रूपये जमविण्यात आले. सध्या पोलीस कोठडीत असलेल्या मेंडके यांच्या संपत्तीचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मानकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या तक्रारीत केली आहे.गडचिरोली पोलिसांनीही मेंडके यांच्या कार्यकाळातील नोकर भरतीची चौकशी करावी, अशी मागणीही विविध संघटनांकडून होत आहे.