विद्यार्थ्यांनी साधला शिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद

By Admin | Updated: August 9, 2014 01:13 IST2014-08-09T01:13:53+5:302014-08-09T01:13:53+5:30

केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्यासोबत संपर्क साधून शिक्षण विभागाच्या मार्फतीने राबविण्यात ....

Interaction with the Education Officer | विद्यार्थ्यांनी साधला शिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद

विद्यार्थ्यांनी साधला शिक्षणाधिकाऱ्यांशी संवाद

कुरखेडा : केंद्रांतर्गत येणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्यासोबत संपर्क साधून शिक्षण विभागाच्या मार्फतीने राबविण्यात येणाऱ्या शालेय उपक्रमांची अंमलबजावणी होत असल्याची माहिती दिली.
कुरखेडा केंद्रांतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या १५ शाळा, खासगी व्यवस्थापनाच्या ८ शाळा व ३ कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सुचविलेल्या उपक्रमांची व केंद्राच्या साप्ताहीक व प्रश्नमंजूषा या उपक्रमाची अंमलबजावणी होते किंवा नाही. यासाठी केंद्रप्रमुख राजू वडपल्लीवार यांनी शाळांना भेट देऊन पाहणी केली. यावेळी जिल्हा परिषद उर्दू शाळेला भेट दिली. विद्यार्थ्यांना ^‘एक मुल, एक झाड’, एक शाळा, एक बंधारा’ रात्री ७ ते १० वाजेपर्यंत घरची टिव्ही बंद ठेऊन यावेळात अभ्यास करणे, साप्ताहिक मंजूषा इत्यादी उपक्रमांची अंमलबजावणी होत असल्याचे दिसून आले. शाळा भेटीवर असलेले कें द्रप्रमुख वडपल्लीवार यांनी स्वत:च्या मोबाईलवरून शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी विद्यार्थ्यांना संवाद साधण्यास सांगितले. महाविश, यशस्वी मनोहर प्रधान, भुमेश्वरी श्रावण देशमुख, यामिनी विजय पुस्तोडे, विशाखा परमानंद खुणे या विद्यार्थ्यांनी संवाद साधला. शिक्षणाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रश्नमंजूषा हा कार्यक्रम त्यांच्या शाळेमध्ये राबविला जात असल्याचे सांगितले. रात्री ७ ते १० वाजेपर्यंत घरातील टिव्ही बंद ठेवत असून या वेळात अभ्यास करीत असल्याची माहिती दिली. कोणतीही भीती न बाळगता विद्यार्थ्यांनी अगदी दिलखुलासपणे शिक्षणाधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावरून विद्यार्थी मानसिकदृष्ट्याही सक्षम झाले असल्याचे दिसून येते. यावेळी उपस्थित शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतूक केले. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Interaction with the Education Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.