लवकरच सुरू होणार आंतरजिल्हा वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 05:00 AM2020-06-23T05:00:00+5:302020-06-23T05:01:23+5:30

इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत कोरोनाची स्थिती चांगली आहे. नागरिकांनी केलेले सहकार्य आणि प्रशासनाचे चांगले नियोजन यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. शिवाय मृत्यू नगण्य असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्याला ५.५ कोटी तर जिल्हा नियोजन समितीमधील २५ टक्के निधी उपलब्ध करून दिल्याचे ना.वडेट्टीवार यांनी सांगितले.

Inter-district transport will start soon | लवकरच सुरू होणार आंतरजिल्हा वाहतूक

लवकरच सुरू होणार आंतरजिल्हा वाहतूक

Next
ठळक मुद्देपालकमंत्री : जनजीवन सुरळीत करण्यासाठी खबरदारी घेऊन उपाययोजना राबविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : येत्या १ जुलैपासून प्रतिबंधित क्षेत्र आणि रेड झोनवगळता इतर भागातील आंतरजिल्हा वाहतूक (एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात) विनापास सुरू होऊ शकते. त्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली असून ते याबाबतचा निर्णय घेऊन जाहीर करतील, अशी माहिती राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री तथा गडचिरोलीचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रपरिषदेत दिली. जिल्ह्याच्या आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत कोरोनाची स्थिती चांगली आहे. नागरिकांनी केलेले सहकार्य आणि प्रशासनाचे चांगले नियोजन यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. शिवाय मृत्यू नगण्य असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापनासाठी मदत व पुनर्वसन विभागाकडून जिल्ह्याला ५.५ कोटी तर जिल्हा नियोजन समितीमधील २५ टक्के निधी उपलब्ध करून दिल्याचे ना.वडेट्टीवार यांनी सांगितले. पत्रपरिषदेला जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आ.डॉ. नामदेव उसेंडी, आनंदराव गेडाम, हरीराम वरखडे, जि.प.सदस्य राम मेश्राम आदी प्रामुख्याने उपस्थित होते. तत्पूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. जिल्ह्यात कोरोना स्थिती नियंत्रणात असल्याने जनजीवन सुरळीत करण्यासाठी विशेष खबरदारी घेवून उपाययोजना राबविण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. लोकांमधील कोरोनाची भिती दूर झाली असली तरी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना उद्देशून केले. प्रशासन सर्व कामांना टप्प्याटप्प्याने मंजुरी देत आहे. आदिवासी भागात तीनही प्रकल्प अधिकाºयांना दोन-दोन हजार घरकुलांचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. आदिवासी लोकांचे जीवनमान सुधारण्यासाठी शासनाकडून येणारा निधी खर्च करावा, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या.
बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, अहेरी विधानसभा क्षेत्राचे आमदार धर्मरावबाबा आत्राम, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे प्रामुख्याने उपस्थित होते.

गडचिरोली व अहेरीसाठी अत्याधुनिक स्पर्धा परीक्षा अभ्यासिकांचे प्रस्ताव
गडचिरोली आणि अहेरी येथे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी डीजिटल अत्याधुनिक अभ्यासिका सुरू करण्यासाठी प्रक्रि या सुरू करण्यात आली आहे. आदिवासी विद्यार्थी व सर्वसाधारण विद्यार्थ्यांना अनुक्रमे ७० व ३० टक्के याप्रमाणे त्याचा लाभ घेता येणार आहे. तसेच ५० एकर जागेत रोजगार प्रशिक्षण केंद्र उभारले जाणार असून लष्करी प्रशिक्षणाप्रमाणे विद्यार्थ्यांना शिस्तबद्धतेची शिकवण तिथे मिळेल. त्याबाबत प्रस्ताव पाठविला जात आहे. आदिवासी विकास विभागाकडून त्यासाठी निधी मिळणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. जिल्ह्यातून चांगले अधिकारी निर्माण होण्यासाठी व शिक्षणाची गोडी स्थानिक युवकांना लागण्यासाठी याचे नियोजन केला जात आहे.

मेडिकल कॉलेज व प्रयोगशाळेची प्रक्रि या अंतिम टप्प्यात
जिल्ह्यात मंजुरी मिळालेले मेडिकल कॉलेज पुढील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष सुरू करण्याचे नियोजन आहे. २.१८ कोटींची प्रयोगशाळा सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला आहे. या लॅबमुळे कोरोना चाचण्यांसह इतर आजारांवरील चाचण्याही जिल्ह्यातच होणार आहेत.
 

Web Title: Inter-district transport will start soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.