मिचगाव परिसरात धानाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 23:10 IST2017-10-29T23:10:31+5:302017-10-29T23:10:51+5:30

गडचिरोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के यांनी तालुक्यातील मिचगाव परिसराला भेट देऊन या भागातील धान पिकाची पाहणी केली असता,...

Inspection of the house in Mitchgaon area | मिचगाव परिसरात धानाची पाहणी

मिचगाव परिसरात धानाची पाहणी

ठळक मुद्देतुडतुड्याचा प्रादुर्भाव : कृषी विभागाचे अधिकारी बांधावर

लोकमत न्यूज नेटवर्क
धानोरा : गडचिरोलीचे उपविभागीय कृषी अधिकारी सोनटक्के यांनी तालुक्यातील मिचगाव परिसराला भेट देऊन या भागातील धान पिकाची पाहणी केली असता, धानावर तुडतुडा किडीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होऊन धानाचे नुकसान झाल्याचे आढळून आले.
उपविभागीय कृषी अधिकारी एम. के. सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात किड नियंत्रक सी. व्ही. चलकलवार यांनी तालुक्यातील धान व तूर पिकावरील किड व पिकांची पाहणी केली. मिचगाव खुर्द येथील रामचंद्र वाघोबा कुरेशी यांच्या शेतीसह अन्य शेतकºयांच्या जड प्रतिच्या धानाची पाहणी केली. तुडतुडा किडीच्या नियंत्रणाकरिता धान पिकावर ट्रायझोफॉस ४० टक्के प्रवाही २० मि.ली. १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी, तसेच फवारणी करताना काळजी घ्यावे, असे सोनटक्के यांनी सांगितले.

Web Title: Inspection of the house in Mitchgaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.