मेळाव्यात दिली योजनांची माहिती
By Admin | Updated: January 17, 2015 22:59 IST2015-01-17T22:59:11+5:302015-01-17T22:59:11+5:30
पोलीस व महसूल विभागाच्यावतीने जनजागरण मेळाव्याचे आयोजन भामरागड येथे करण्यात आले होते. मेळाव्यात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर,

मेळाव्यात दिली योजनांची माहिती
भामरागड : पोलीस व महसूल विभागाच्यावतीने जनजागरण मेळाव्याचे आयोजन भामरागड येथे करण्यात आले होते. मेळाव्यात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर, दाखल्यांचे वाटपही यावेळी करण्यात आले.
मेळाव्याचे उद्घाटन पं. स. सभापती रंजना उईके यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी नायब तहसीलदार गावडे होते. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी विजय धापके, पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चंद्रकांत चौधरी, गट शिक्षणाधिकारी सहारे, सब्बरबेग मोगल, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अश्विन जयराजन, बालविकास प्रकल्प अधिकारी मुलमुले, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मुडपल्लीवार, सीआरपीएफच्या ३७ बटालियनचे कमांडंट जयसिंग, ९ बटालियनचे तुळस्कर उपस्थित होते.
जनजागरण मेळाव्यादरम्यान १० गावातील आदिवासी समाजबांधवांना विविध विभागाच्या योजनांची माहिती स्टॉल लावून देण्यात आली. तसेच आवश्यक दाखल्याचे वितरण करण्यात आले. अनेक लाभार्थ्यांचे विविध योजनांच्या लाभासाठी अर्ज भरूण घेण्यात आले. आरोग्य विभागामार्फत नि:शुल्क आरोग्य तपासणी करून औषधोपचार करण्यात आला. दरम्यान आयोजित रक्तदान शिबिरात सीआरपीएफच्या ३७ ए व ९ बटालियनच्या जवानांनी रक्तदान केले.
नक्षलवाद्यांच्या विरोधाला न जुमानता जनजागरण मेळाव्याला नागरिकांनी उपस्थिती दर्शविली. शासनाच्या योजनांवर विश्वास दाखविल्याचे समाधान प्रभारी पोलीस अधिकारी चंद्रकांत चौधरी यांनी प्रास्ताविकातून व्यक्त केले. संचालन संतोष मंथनवार तर आभार पोलीस उपनिरीक्षक अनंत कांबळे यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)