महागावातील पाणी समस्या सुटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 06:00 IST2019-11-02T06:00:00+5:302019-11-02T06:00:32+5:30

उन्हाळ्यातील एप्रिल, मे महिन्यात महागाव बुज गावात पाणी संकट निर्माण होत असते. गतवर्षीच्या उन्हाळ्यात नळ पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आले व त्याचे कामही हाती घेण्यात आले. दरम्यान पावसाळा लागल्याने हे काम काही महिने थांबले. आता पुन्हा कामास सुरूवात झाली असून हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

Inflation will solve water problem | महागावातील पाणी समस्या सुटणार

महागावातील पाणी समस्या सुटणार

ठळक मुद्देमुख्यमंत्री पेयजल योजना : प्राणहिता नदीवर विहिरीचे बांधकाम प्रगतिपथावर

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव (बु.) : अहेरी तालुक्याच्या महागाव बुज येथे दरवर्षीच्या उन्हाळ्यात विहिरी व हातपंपाची पाणीपातळी खालावत असल्याने पाणीटंचाईची समस्या निर्माण होत होती. या समस्याची दखल घेऊन गावात मुख्यमंत्री पेयजल योजनेअंतर्गत नळ पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. या योजनेचे काम प्रगतीपथावर असल्याने गावातील पाणीटंचाईची समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे.
उन्हाळ्यातील एप्रिल, मे महिन्यात महागाव बुज गावात पाणी संकट निर्माण होत असते. गतवर्षीच्या उन्हाळ्यात नळ पाणीपुरवठा योजना मजूर करण्यात आले व त्याचे कामही हाती घेण्यात आले. दरम्यान पावसाळा लागल्याने हे काम काही महिने थांबले. आता पुन्हा कामास सुरूवात झाली असून हे काम लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे. महागाव (बुज) व महागाव (खुर्द) या दोन मोठ्या गावांसाठी नळ योजना मंजूर करण्यात आली. नाली खोदून नळ पाईपलाईनचे काम पूर्ण करण्यात आले. प्राणहिता नदीवर मोठ्या विहिरीचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. तसेच नदीकाठावर जलकुंभाच्या कामाने गती घेतली आहे. प्राणहिता नदीवर मोठ्या विहिरीचे काम केले जाणार असून नळ पाईपलाईनच्या सहाय्याने महागाव बुज व महागाव खुर्द या दोन्ही गावाला पाणी पोहोचविण्यात येणार आहे. घरगुती नळ कनेक्शन देण्यात येणार आहे. सदर नळ योजनेचे काम लवकर पूर्ण करण्याचे प्रशासनाचे निर्देश असल्याने येथील पाणी समस्या मार्गी लागणार आहे.
दरवर्षीच्या उन्हाळ्यात या भागात पाणी संकट निर्माण होत असते. नवीन हातपंप खोदूनही मे महिन्यात हातपंपाला पाणी राहत नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून महागाव बुज व खुर्द या दोन्ही गावातील नागरिकांकडून नळ पाणीपुरवठा योजनेची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेऊन नळ योजना मंजूर करण्यात आली.

Web Title: Inflation will solve water problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी