पहिली लाट राेखलेल्या ५४ गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:39 IST2021-04-28T04:39:58+5:302021-04-28T04:39:58+5:30
काेट ताेडसा ग्रामपंचायतींतर्गत पेठा, ताेडसा, एकरा बुज, एकरा खुर्द, झारेवाडा, आलेंगा, कारमपल्ली, लांजी, दाेडी ही गावे येतात. या गावांमध्ये ...

पहिली लाट राेखलेल्या ५४ गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव
काेट
ताेडसा ग्रामपंचायतींतर्गत पेठा, ताेडसा, एकरा बुज, एकरा खुर्द, झारेवाडा, आलेंगा, कारमपल्ली, लांजी, दाेडी ही गावे येतात. या गावांमध्ये एकूण ४ हजार ७६० लाेकसंख्या आहे. काेराेनाबाबत नागरिकांमध्ये जागृती करण्यासाठी ठिकठिकाणी पाेस्टर्स, बॅनर्स लावण्यात आले. त्यामुळे नागरिक मास्क, सॅनिटायझरचा वापर करणे, शहरापासून दूर राहणे या बाबींवर भर दिला. त्यामुळेच या सर्व गावांमध्ये अजूनही काेराेनाचा एकही रुग्ण आढळून आला नाही.
- प्रशांत आत्राम, सरपंच, ताेडसा
गुरनाेली गावाला काेराेनापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न ग्रामपंचायतीने केला. मात्र, याला यश आले नाही. दुसऱ्या लाटेत काेराेनाचे रुग्ण आढळून आले आहेत. नागरिकांनी काेराेनाचा संसर्ग हाेणार नाही, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. ज्या नागरिकांना काेराेनाचा संसर्ग झाला आहे, त्यांनी घाबरून जाऊ नये. ग्रामपंचायत प्रशासन त्यांच्या पाठीशी आहे.
- सुप्रिया गणेश तुलावी, सरपंच, गुरनाेली
बाॅक्स
काेरची तालुक्यातील १४ नवीन गावांमध्ये काेराेना
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत काेरची तालुक्यातील १४ नवीन गावांमध्ये काेराेनाचा शिरकाव झाला. अहेरी तालुक्यात ४, आरमाेरी ३, भामरागड ९, चामाेर्शी ३, धानाेरा २, एटापल्ली २, गडचिराेली १, कुरखेडा ९, मुलचेरा ३, सिराेंचा ४ व देसाईगंज तालुक्यातील एका नवीन गावामध्ये दुसऱ्या लाटेत काेराेनाचा शिरकाव झाला आहे.
जिल्ह्यातील एकूण गावे १६८८
सध्या काेराेना रुग्ण असलेली गावे ३५५
काेराेनामुक्त गावे १३३३