पुलावरुन रहदारी वाढल्याने नदी किनारा सामसूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:38 IST2021-03-27T04:38:11+5:302021-03-27T04:38:11+5:30
सिरोंचाजवळून वाहणाऱ्या प्रणाहिता नदीवर पुलाचे बांधकाम हाेण्यापूर्वी नदीतून नागरिक नावेद्वारे तेलंगणा राज्यातील शहरात जात असत. दरराेज शेकडो लोक डझनभर ...

पुलावरुन रहदारी वाढल्याने नदी किनारा सामसूम
सिरोंचाजवळून वाहणाऱ्या प्रणाहिता नदीवर पुलाचे बांधकाम हाेण्यापूर्वी नदीतून नागरिक नावेद्वारे तेलंगणा राज्यातील शहरात जात असत. दरराेज शेकडो लोक डझनभर बोटींमधून प्रवास करीत होते. नदी मार्ग हा तहसीलमधील लोकांचा शेजारच्या तेलंगणा राज्यात जाण्यासाठी एकमेव मार्ग होता. दाेन वर्षांपूर्वी धर्मपुरी जवळील नदीवर पुलाचे बांधकाम झाल्याने सिरोंचा तालुक्यातील नागरिक पुलावरून ये-जा करीत आहेत. पुलावरून रहदारी वाढल्याने लोकांनी शेजारच्या राज्यात जाण्यास सुरूवात केली आहे. यासह या नदी घाटावर शांतता दिसून येत आहे. पूर्वी बोट घाटाच्या लिलावाच्या नावाखाली सरकारला महसूल मिळत हाेता. त्याच वेळी, नौका चालविण्याशी संबंधित लोकांना रोजगारही मिळत होता. या नदी पात्रातून तेलंगणा राज्याच्या कालेश्वर, अर्जूनगुटा घाटावर नेले जात असे. तेथून लोक आपल्या गरजेनुसार तेलंगणाच्या शहरांकडे जात असत. सकाळपासूनच नदी घाटावर नागरिक मोठ्या प्रमाणात दिसून येत होते. रात्री उशिरापर्यंत गर्दी राहत होती. शहरातील अर्थव्यवस्थेला बोटींचा फटका बसला. या घाटावर बोटीतून दररोज कोट्यवधीच्या किराणा मालाची वाहतूक केली जात असे, असे लोकांचे म्हणणे आहे. याशिवाय अहेरी, आष्टी, गोंडपिंपरी, चंद्रपूर येथूनही व्यवसायाचे व्यवहार केले जात हाेते. या मालाची वाहतूकही बोटीतून दररोज होत असे. याशिवाय नौका एकमेकांना जोडून चारचाकी वाहने देखील वाहून नेली जात होती.
बाॅक्स
विकास केल्यास राेजगाराची संधी
नदीतील बोट ऑपरेशनशी संबंधित लोकांचा रोजगारही काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे प्राणहिता नदीतील बाेटीची सफर संपुष्टात आली. याशिवाय नदीच्या वरच्या बाजूस पार्क बनवून शहराच्या लोकांसाठी ते स्थान म्हणून आकर्षित आणि विकसित केले जाऊ शकते. या माध्यमातून नदीकाठच्या लोकांना राेजगार मिळू शकताे. याकरिता शासन व प्रशासनाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.