गडचिराेली : तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागातील शेतकरी खरीप हंगामातील धानपीक निघाल्यानंतर रबी पिकाची लागवड करीत असतात. यात बऱ्याच शेतकऱ्यांनी पर्यायी पीक म्हणून बाेरू पिकाची लागवड केली आहे.
शेतीत सेंद्रिय खताचा वापर कमी हाेत असल्याने काही शेतकरी जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी हिरवळीचे खत म्हणून बाेरू पिकाची लागवड करीत असतात. त्यामुळे जमिनीची पाेेत सुधारणा हाेत असते. मात्र शेतकरी आता रबी हंगामातसुद्धा बाेरू पिकाची लागवड करीत आहेत. सध्या बाेरू पीक फुलाेऱ्यावर आहे. लागलेली पिवळी फुले ये-जा करणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. बाेरू पिकाच्या लागवडीसाठी मशागत खर्चसुद्धा कमी येताे. बाेरू पिकामुळे जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत हाेते. शिवाय बाेरू बियाण्यालासुद्धा चांगला भाव मिळत असताे. या पिकाला अतिशय कमी प्रमाणात राेगाची लागण हाेते.