कन्नमवार जलाशयातील गाळ काढून पाणीक्षमता वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:37 IST2021-05-12T04:37:59+5:302021-05-12T04:37:59+5:30
गडचिराेली : चामाेर्शी तालुक्यातील रेगडी कन्नमवार जलाशयामुळे सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. गेल्या ४७ वर्षांपासून जंगली डाेंगराळ भागातून पाण्याच्या ...

कन्नमवार जलाशयातील गाळ काढून पाणीक्षमता वाढवा
गडचिराेली : चामाेर्शी तालुक्यातील रेगडी कन्नमवार जलाशयामुळे सिंचन सुविधा निर्माण झाली आहे. गेल्या ४७ वर्षांपासून जंगली डाेंगराळ भागातून पाण्याच्या प्रवाहाबराेबर वाहत येणाऱ्या गाळामुळे नहर तसेच जलाशय बुजले आहे. गाळाचा उपसा करून या जलाशयाची पाणी साठवणूक क्षमता वाढवावी, अशी मागणी काॅंग्रेसच्या राेजगार याेजना सेलचे जिल्हाध्यक्ष काशीनाथ भडके यांनी केली.
रेगडी जलाशयात गाळ साचला आहे. नहर अनेक ठिकाणी फुटले आहे. संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना व लाेकप्रतिनिधींना हे सर्व दिसत आहे. मात्र गाळाचा उपसा करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शासनाने रेगडी कन्नमवार जलाशयाच्या व नहराच्या देखभालीसाठी तसेच संरक्षणासाठी चामाेर्शी, घाेट व भेंडाळा येथे सिंचन विभागाचे प्रशासकीय कार्यालय निर्माण केले असून, येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावर दरवर्षी काेट्यवधी रुपयांचा खर्च हाेत असताे. गाळ साचला असून नहर ठिकठिकाणी फुटले आहेत. त्यामुळे चामाेर्शी तालुक्याच्या शेवटच्या शेतकऱ्यांना या नहराचे पाणी पाेहाेचत नाही. त्यामुळे गाळ काढून फुटलेल्या नहराची दुरुस्ती करावी, अशी मागणी भडके यांनी केली आहे.