बियाणे खरेदीसाठी लगबग वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 23:52 IST2018-06-03T23:52:12+5:302018-06-03T23:52:22+5:30
खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला १५ दिवसांत सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे.

बियाणे खरेदीसाठी लगबग वाढली
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : खरीप हंगामातील पिकांच्या पेरणीला १५ दिवसांत सुरूवात होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी केंद्रांमध्ये बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू केली आहे.
जिल्ह्यात जवळपास १० जूनपर्यंत पावसाचे आगमन होते. जोरदार पाऊस झाल्यानंतर लगेच शेतीच्या मशागतीला सुरूवात होते. वेळेवर बियाणे खरेदीसाठी वेळ मिळत नसल्याने शेतकºयांनी आतापासूनच त्यांना लागणारे बियाणे खरेदी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे गडचिरोली शहरातील कृषी केंद्रांवर बियाणे खरेदीसाठी शेतकºयांची लगबग वाढली असल्याचे दिसून येते.
गडचिरोली तालुक्यात सर्वाधिक धानपिकांचेच उत्पादन घेतले जाते. सिंचनाची सुविधा उपलब्धतेनुसार शेतकरी जड किंवा हलक्या धानाची लागवड करतात. यावर्षी बाजारात धानाचे १३-१२, जयश्रीराम, जोरदार, आरपीएन, बलवान, शबरी, ओम-३, क्रांती, श्रीकृष्ण आदी वान उपलब्ध आहेत. एका किलोसाठी १० किलो बियाणे लागतात. त्यामुळे १० किलोची एक बॅग बियाणे निर्मिती कंपन्या तयार करतात. १० किलो बॅगसाठी ५०० ते ६६० रूपये भाव आहे. मागील वर्षीच्या तुलनेत बियाणांच्या भावात कोणतीही वाढ झाली नाही, अशी माहिती कृषी केंद्र चालक यांनी दिली आहे.
दिवसेंदिवस शेतकरी संकरीत बियाणांचा वापर अधिक प्रमाणात करीत आहेत. त्यामुळे कृषी केंद्रातून बियाणे खरेदी करण्याचे प्रमाण वाढले आहे.