पोलीस पाटलांचे मानधन वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 05:00 IST2019-12-23T05:00:00+5:302019-12-23T05:00:20+5:30

गाव पातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना ६ हजार ५०० रूपये मानधन दिले जात आहे. सदर मानधन नियमित दिले जात नाही. त्यामुळे पोलीस पाटलांना १५ हजार रूपये मानधन द्यावे, पोलीस पाटील सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्ष करावी, तुटपूंज्या मानधनावर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना सेवानिवृत्तीनंतर कोणताही आर्थिक आधार नसल्याने सेवानिवृत्ती म्हणून २ लाख रूपये द्यावे किंवा ६ हजार रूपये प्रति माह पेंशन द्यावी.

Increase the honor of police brigades | पोलीस पाटलांचे मानधन वाढवा

पोलीस पाटलांचे मानधन वाढवा

ठळक मुद्देविधानसभा अध्यक्षांना निवेदन : गाव कामगार पोलीस पाटील संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गाव पातळीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस पाटलांना अत्यल्प मानधन दिले जाते. महागाईच्या काळात सदर मानधन परवडणारे नाही. त्यामुळे पोलीस पाटलांचे मानधन वाढवून अन्य मागण्या मार्गी लावाव्या, अशी मागणी महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, गाव पातळीवर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना ६ हजार ५०० रूपये मानधन दिले जात आहे. सदर मानधन नियमित दिले जात नाही. त्यामुळे पोलीस पाटलांना १५ हजार रूपये मानधन द्यावे, पोलीस पाटील सेवानिवृत्तीची वयोमर्यादा ६० वरून ६५ वर्ष करावी, तुटपूंज्या मानधनावर काम करणाऱ्या पोलीस पाटलांना सेवानिवृत्तीनंतर कोणताही आर्थिक आधार नसल्याने सेवानिवृत्ती म्हणून २ लाख रूपये द्यावे किंवा ६ हजार रूपये प्रति माह पेंशन द्यावी. पोलीस पाटील भरतीत त्यांच्या वारसानास योग्यतेनुसार प्राधान्य द्यावे, कार्यरत असताना पोलीस पाटलांचे अपघाती किंवा नैसर्गिकरित्या निधन झाल्यास त्यांच्या वारसानाचा शासकीय नोकरीत समावेश करावा, बैठक भत्ता, प्रवास भत्ता नियमित द्यावा, दरमहा वेतन द्यावे आदी मागण्यांचा समावेश होता. या सर्व मागण्या व समस्यांवर विधानसभा अध्यक्ष नाना पटोेले यांच्याशी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर यांच्या नेतृत्त्वात चर्चा करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु त्यांची भेट होऊ न शकल्याने त्यांनाही निवेदन पाठविण्यात आले.
शिष्टमंडळात गाव कामगार पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद ब्राम्हणवाडे, जिल्हा सचिव मुरारी दहीकर, नरेंद्र बनपुरकर, गणेश वनवे, योगराज नाकाडे, शालिक पुराम, अनिल कोठारे तसेच भंडारा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस पाटील संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

Web Title: Increase the honor of police brigades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.