रेल्वे स्टेशनला दीड कोटीचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 23:20 IST2018-05-05T23:20:31+5:302018-05-05T23:20:31+5:30
गोंदिया-बल्लारशहा रेल्वे मार्गावर असलेल्या देसाईगंज रेल्वेस्टेशनने २०१८ या वर्षभरात ९ लाख २५ हजार प्रवाशांची वाहतूक करीत १ कोटी ५४ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.

रेल्वे स्टेशनला दीड कोटीचे उत्पन्न
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गोंदिया-बल्लारशहा रेल्वे मार्गावर असलेल्या देसाईगंज रेल्वेस्टेशनने २०१८ या वर्षभरात ९ लाख २५ हजार प्रवाशांची वाहतूक करीत १ कोटी ५४ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त केले आहे.
देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्टेशन आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश रेल्वे प्रवाशी त्यांचा पुढील प्रवास देसाईगंज येथूनच करतात. मागील काही वर्षात या मार्गावरून धावणाऱ्या ट्रेनची संख्या सुध्दा वाढली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ होत आहे. १७ एप्रिल १९९३ साली या रेल्वेलाईनला ब्रॉडगेजमध्ये परावर्तीत करण्यात आले. तेव्हापासून प्रवाशी व ट्रेनची संख्या वाढली आहे. १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत देसाईगंज रेल्वेस्टेशनमधून एकूण ९ लाख २५ हजार २८० प्रवाशांनी प्रवास केला. या प्रवाशांकडून रेल्वेला १ कोटी ५४ लाख २६ हजार ११० रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे. देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग तयार करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या रेल्वे मार्गाचे काम पूर्ण झाल्यास प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची अपेक्षा आहे.
सोयीसुविधांचा अभाव
कोट्यवधी रूपयांचे उत्पन्न जरी या रेल्वेस्थानकातून मिळत असले तरी रेल्वे प्रशासन मात्र प्रवाशांना सोयीसुविधा पुरविण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते. गोंदिया-बल्लारशहा दरम्यान दुसरी रेल्वेलाईन टाकण्याची मागणी माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी यांनी केली आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.