विद्यापीठाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

By Admin | Updated: January 20, 2015 22:36 IST2015-01-20T22:36:07+5:302015-01-20T22:36:07+5:30

स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ १७ जानेवारी रोजी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आला.

Inauguration of University website | विद्यापीठाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

विद्यापीठाच्या संकेतस्थळाचे उद्घाटन

गडचिरोली : स्थानिक गोंडवाना विद्यापीठाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ १७ जानेवारी रोजी केंद्रीय रसायन व खते राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. कीर्तिवर्धन दीक्षित, प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम, माजी प्रकुलगुरू गौरीशंकर पाराशर, आ. क्रिष्णा गजबे, अरविंद पोरेड्डीवार, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनायक इरपाते आदी मान्यवर उपस्थित होते.
तसेच यावेळी संकेतस्थळ तयार करून देणारे गडचिरोली येथील कुणाल गणेश जैन, विद्यापीठात संगणक विभागात कार्यरत असलेले अमोल खोडवे, प्रमोद बोरकर, कृष्णा देवीकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी केंद्रीय खत आणि रसायन राज्यमंत्री हंसराज अहीर व पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्याच्या या विद्यापीठातील सर्व अडचणी दूर करून दिल्या जातील, असे सांगितले. या कार्यक्रमाला कुलसचिव डॉ. विनायक ईरपाते, डॉ. एस. एम. रोकडे, परीक्षा नियंत्रक डॉ. जे. व्ही. दडवे, वित्त व लेखाधिकारी डॉ. बी. एस. राठोड, विद्यार्थी कल्याणचे संचालक डॉ. ईश्वर मोहुर्ले, क्रीडा विभागाचे संचालक कोहळे, विधीसभा सदस्य प्रकाश गेडाम, किसन नागदेवे, प्रशांत वाघरे, मसराम आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Inauguration of University website

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.