कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास, दारिद्रय रेषेखालील कुटुंबाला मिळते आर्थिक अनुदान; येथे करावा संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2025 16:58 IST2025-02-27T16:56:53+5:302025-02-27T16:58:34+5:30
Gadchiroli : राष्ट्रीय कुटुंब योजनेतून मिळतेय अर्थसहाय्य

In case of death of the earner, the below poverty line family gets financial subsidy; Contact here
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या कर्ता स्त्री-पुरुष मरण पावल्यास राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेत कुटुंबियांना एकरकमी २० हजार रुपये दिले जातात. गेल्या वर्षभरात जिल्ह्यात ४७ कुटूंबांना एकरकमी २० हजार रूपये अर्थसहाय देण्यात आल्याची माहिती आहे. संकटात सापडलेल्या व निराधार कुटुंबीयांशी ही योजना दिलासादायक ठरत असल्याचे दिसून येते.
महसूल विभागाच्या वतीने या योजनेची प्रभावी जनजागृती केली जाते. शासकीय मेळावे, शिबिर तसेच पोलिस विभागाच्या जनजागरण मेळाव्यात महसूल विभागाच्या वतीने स्टॉल लावून या योजनेची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविली जाते. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना हि योजना दारिद्रय रेषेखालील कुटुंबांना आर्थिक मदत देण्यासाठी आहे. या योजनेअंतर्गत, १८ ते ५९ वयोगटातील प्राथमिक कमावणारा माणूस मरण पावल्यास त्याच्या कुटुंबाला २० हजार रुपये एकरकमी मदत दिली जाते. १ लाख दारिद्रय रेषेखालील कुटुंब शहरी व ग्रामीण मिळून बाराही तालुक्यात एकुण १ लाख २३ हजार कुटुंब दारिद्र्य रेषेखालील यादीत आहेत
काय आहे राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना?
दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ वर्ष वयोगटातील कमावत्या व्यक्तीचा अपघाती अथवा नैसर्गिक मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियास एक रकमी २० हजार अर्थसहाय्य देण्यात येते.
वर्षभरात २५ कुटुंबांना प्रत्येकी २० हजार
जिल्ह्यात वर्षीरात ४७ कुटूंबांना एकरकमी २० हजार रूपये अर्थसहाय देण्यात आले आहे. तहसील कार्यालयामार्फत अर्ज पडताळणीची कार्यवाही करण्यात येते.
संपर्क कोठे कराल?
अर्जदार जिल्हाधिकारी कार्यालय/तहसीदार संजय गांधी योजना तसेच तलाठी कार्यालय या ठिकाणी अर्ज करु शकतो.
या योजनेची वैशिष्ट्येः
ही मदत मृत्यूचे कारण विचारात न घेता दिली जाते. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीच्या मृत्यूच्या प्रत्येक घटनेत ही मदत दिली जाते. ही मदत दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील शोकग्रस्त कुटुंबाला दिली जाते. ही मदत मृत गरीब व्यक्तीच्या कुटुंबातील जो सदस्य घराचा प्रमुख असल्याचे आढळून येईल, त्याला दिली जाते. या योजनेची अंमलबजावणी 'राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम' या छत्र योजनेअंतर्गत केली जाते.