वृक्ष व शिक्षण कर वगळून सुधारित करआकारणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:54+5:302021-03-29T04:22:54+5:30
यावेळी प्र. सो गुंडावार, सुखराम साखरे, तारकल बांबोळे, जे. जी. मरस्कोले, डी. एस ,बुरांडे, एस. ...

वृक्ष व शिक्षण कर वगळून सुधारित करआकारणी करा
यावेळी प्र. सो गुंडावार, सुखराम साखरे, तारकल बांबोळे, जे. जी. मरस्कोले, डी. एस ,बुरांडे, एस. के. चलकलवार, आर.डी.राऊत, एस. एस . वाळके, डी. बी. बोरकर आदी उपस्थित होते. चामोर्शी नगर पंचायत प्रशासना कडून शहरात विविध ठिकाणी वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धनाची योजना, बगीचा, शहरातील रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवड व सर्वधन आदी सोयीसुविधा नसून कोणतीही योजना राबविली नाही. तसेच शहरात जिल्हा परिषद कडून नगरपंचायतला व शाळा व अंगणवाडीचे हस्तांतरण झाले नसताना मालमत्ता कर आकारणी करताना महाराष्ट्र( नागरी शेत्र) झाडाचे संरक्षण व जातं अधिनियम १९७५ व महाराष्ट्र शिक्षण आणि रोजगार हमी ( उपक्रम) अधिनियम १९६२ या अधिनियमाला डावलून मालमत्ता कर आकारणी करून शहर वासियांना आर्थिक खाईत टाकण्याचे काम केले असल्याचे सातार यांनी सांगितले.
सुनावणीच्या वेळी मूल्यनिर्धारण विभागाच्या अधिकाऱ्यांना वृक्ष व शिक्षण कर वगळून सुधारित कर आकारणी करावे, उर्वरित मालमत्ता कर भरण्यास तयार असल्याचे त्यावेळी लिहून देण्यात आले असल्याचेही सांगून सुद्धा अधिनियमाला बगल देत कर आकारणी केली आहे. त्यासाठी नियमात सुधारणा होत नाही तोपर्यंत मालमत्ता आकारणी कर घेण्याचा अधिकार नगरपंचायतला नसल्याचे सांगितले.