शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी मस्क यांना झटका देण्यास केली सुरुवात; अमेरिकन सैन्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवली 'गोळी'
2
ऐकावं ते नवलंच... अचानक लोकप्रिय ब्रँडच्या बिअर दुकानांमधून झाल्या गायब, राजधानीत नक्की काय झालं?
3
हाफिज सईद पाकिस्तानात नाही? नेमका कुठे लपून बसलाय तोयबाचा म्होरक्या? 'या' व्यक्तव्यांमधून मिळाले मोठे संकेत
4
हृदयद्रावक! ११ महिन्यांच्या मुलीने गमावले आई-वडील, आजी; झाली अनाथ, डोळे पाणावणारा Video
5
ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीचा ग्रॅज्युएट; तरीही करतोय फूड डिलिव्हरीचं काम, महिन्याला लाखोंची कमाई
6
५ जुलैला जपानवर कोणतेही संकट आलेच नाही? रिओ तात्सुकीची भविष्यवाणी फोल ठरली?
7
सुपरहिट सिनेमांचा साक्षीदार 'फिल्मीस्तान स्टुडिओ' अखेर विकला; फिल्म इंडस्ट्री भावुक
8
Chaturmas 2025: चातुर्मासात दारासमोर रोज दोन बोटं रांगोळी काढा आणि लक्ष्मीकृपा मिळवा!
9
भयंकर! दरोडेखोरांनी घरात घुसून पत्नी, मुलांसमोर केली इंजिनिअरची हत्या; पैसे, दागिने घेऊन पसार
10
अमेरिका-चीन व्यापार युद्धात अंबानींची एन्ट्री? बीजिंगला जाणारे गॅस जहाज आता थेट भारतात!
11
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ५ मूलांक लकी, विविध लाभच लाभ; यश-प्रगती-भरभराट, स्वामी कल्याण करतील!
12
कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही; अमेरिकेसोबतच्या व्यापार करारावर भारताची स्पष्टोक्ती
13
ऑपरेशन सिंदूरनंतर राफेल पाडल्याची अफवा पसरवण्यामागे होतं कोण? फ्रान्सच्या गोपनीय अहवालातून धक्कादायक माहिती समोर
14
उत्तर प्रदेशात आंबा महोत्सवाचा फज्जा, प्रदर्शनस्थळी लोकांकडून लुटालूट, मिळेल त्यात भरून नेले आंबे (Watch Video)
15
पूजेचं निर्माल्य नदीत टाकलं, सेल्फीनंतर पतीसमोरच महिलेने पुलावरून मारली उडी; नागपूरमधील धक्कादायक घटना
16
Viral Video: सिंह पाळणं अंगलंट, व्हिडीओ पाहून कानाला लावाल हात!
17
"जबरदस्त चित्रपट! आमिर खानने केला असता तर ऑस्कर...", 'आता थांबायचं नाय'बद्दल संजय राऊतांची खंत, सरकारला सुनावलं
18
ज्योती मल्होत्राचं केरळ सरकारशी कनेक्शन उघड! राज्याचा पैसा वापरुन मुन्नार-कोची फिरली अन्... 
19
एकेकाळी दारुचे पाट वाहिलेल्या दिल्लीत, प्रचंड बिअर टंचाई; भलेभले ब्रँड शोधूनही सापडत नाहीत...
20
'Google' स्मार्टफोन युझर्संना देतंय ८५०० रुपये, तुम्हालाही मिळू शकतात 'हे' पैसे! कसं जाणून घ्या

किसान निधीची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2019 01:17 IST

केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.

ठळक मुद्देकागदपत्रे जमा करा : शेतकऱ्यांना मिळणार वार्षिक सहा हजार रूपये अनुदान

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : केंद्रीय अर्थसंकल्पात नमूद केलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधीची अंमलबजावणी करण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याला वार्षिक सहा हजार रूपयांचे अनुदान दिले जाणार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील जवळपास एक लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल, अशी अपेक्षा आहे.केंद्र व राज्य शासनाकडून शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात आल्या असल्या तरी शेतकºयांच्या आर्थिक स्थितीमध्ये फारसा फरक पडला नाही. विद्यमान भाजपा सरकारने २०१९-२० या वर्षाचा अर्थसंकल्प सादर करताना दोेन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रूपये अनुदान देण्याची योजना आणली आहे. या योजनेला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी असे नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे १ फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शेतकऱ्यांकडून माहिती मागविण्यास सुरुवात झाली आहे.जमिनीसंदर्भातील माहिती महसूल विभागाकडेच असल्याने शेतकऱ्यांना केवळ आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स संबंधीत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्याकडे उपलब्ध करून द्यायची आहे. विशेष म्हणजे दोन हेक्टरपेक्षा कमी शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.२०१०-११ च्या कृषी गणनेनुसार ०.५ हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेले २५ हजार ९१७ शेतकरी आहेत. ०.५ ते १ हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेले ३१ हजार ४२५ शेतकरी आहेत. तर १ ते २ हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेले ४१ हजार ४८८ शेतकरी आहेत, असे एकूण जिल्हाभरात जवळपास ९८ हजार ८३० शेतकरी होतात. ही आकडेवारी आठ वर्षांपूर्वीची आहे. आठ वर्षांत जमिनीचे तुकडे पडून शेतकºयांची संख्या वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या योजनेसाठी पात्र ठरणाºया शेतकऱ्यांची संख्या सव्वा लाखांच्या जवळपास पोहोचण्याची शक्यता नाकारता येत नाही.आधारकार्ड व बँकेचे पासबुकतलाठ्याकडे जमा करा-तहसीलदारया योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांना त्यांचा आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स प्रत साजातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्याकडे जमा करायची आहे. पात्र शेतकऱ्यांची नावे शासनाकडे पाठवायची आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी शक्य तेवढ्या लवकर आधारकार्ड व बँक पासबुकची झेरॉक्स तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक यांच्याकडे जमा करावी, असे आवाहन गडचिरोलीचे तहसीलदार दयाराम भोयर यांनी केले आहे.बुधवारी पार पडली सभागडचिरोली येथील गोंडवाना कलादालनात उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रधानमंत्री किसान सन्मान निधीबाबतची सभा पार पडली. या सभेला नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, सहायक निबंधक संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते. या सभेत किसान सन्मान निधी योजनेची अंमलबजावणी कशी करावी, याबाबत महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीला गती मिळाली आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी