शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

पंचनामे करून शेतकऱ्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2022 05:00 IST

२४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला होता. गारपीटसह झालेल्या या वादळी पावसात शहरातील व अन्य गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांची घरे कोसळली. तर अनेकांचे घरावरील टिनपत्रे उडाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तत्काळ सिरोंचा दौरा करून स्थानिक तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी या उदात्त हेतूने तत्काळ मोका पंचनामा करण्याचे निर्देश दिले.

लाेकमत न्यूज नेटवर्कसिरोंचा : कोरोनासह विविध संकटांमुळे शेतकरी अगोदरच हवालदिल झाला आहे आणि निसर्गानेही त्याच्यावर अवकृपा दाखविली आहे. २४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी वारा, गारपीटसह अवकाळी पाऊस झाल्याने तालुका मुख्यालयासह इतरही गावांतील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे, कोसळलेल्या घरांचे व आदी नुकसानीचे त्वरित पंचनामे करून तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, असे निर्देश आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी दिले.२४ मे रोजी सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने चांगलाच तडाखा दिला होता. गारपीटसह झालेल्या या वादळी पावसात शहरातील व अन्य गावांतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक नागरिकांची घरे कोसळली. तर अनेकांचे घरावरील टिनपत्रे उडाल्याने संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तत्काळ सिरोंचा दौरा करून स्थानिक तहसील कार्यालयात अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन अवकाळीचा आढावा घेत नुकसानग्रस्तांना नुकसानभरपाई मिळावी या उदात्त हेतूने तत्काळ मोका पंचनामा करण्याचे निर्देश दिले.एवढेच नव्हे तर तालुक्यातील कुठल्याही गावात एकही नुकसानग्रस्त नागरिक व शेतकरी मदतीपासून सुटणार नाही, याची दक्षता घेण्याचेही निर्देश दिले. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भाग्यश्री आत्राम, सामाजिक कार्यकर्ते बबलू हकीम, राष्ट्रवादीच्या विभागीय अध्यक्ष शाहीन हकीम, तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लुरी उपस्थित होते.

नुकसानग्रस्तांसोबत साधला थेट संवाद-    सिरोंचा तालुक्यात वादळी पावसाने अनेकांचे नुकसान केले. याची माहिती मिळताच आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी तालुक्यातील विविध गावांत प्रत्यक्ष भेटी देऊन नुकसानग्रस्तांशी संवाद साधत परिस्थिती जाणून घेतली. स्थानिक नगरपंचायत हद्दीतील काही प्रभागातसुद्धा त्यांनी भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाकडून त्वरित नुकसानभरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सिरोंचा तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.-    दरम्यान यावेळी सिराेंचा तालुक्यासह अहेरी उपविभागातील विविध समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. काही नागरिकांनी रस्ते, नाली, पिण्याचे पाणी, वीजबिल आदीबाबत तक्रारी मांडल्या. या तक्रारीचे निरसन करण्याची विनंती आ.धर्मरावबाबा आत्राम यांना यावेळी केली. 

 

टॅग्स :Farmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना