भाव नाही, तर तारण ठेवा ! धानासह विविध शेत मालासाठी शासनाची योजना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 16:02 IST2025-02-11T16:01:28+5:302025-02-11T16:02:02+5:30

६ टक्के व्याजदर : बाजार समितींमध्ये गोदामाची सोय

If not the price, then keep the pledge! Government's scheme for various farm products including paddy | भाव नाही, तर तारण ठेवा ! धानासह विविध शेत मालासाठी शासनाची योजना

If not the price, then keep the pledge! Government's scheme for various farm products including paddy

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
शेतमालाचे दर बाजारात कमी असले किंवा भाव पडले असल्यास शेतकऱ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल तारण ठेवून कर्ज प्राप्त करता येते. जेव्हा शेतमालाचे दर वधारतात, तेव्हा सदर माल शेतकऱ्यांना विक्री करता येतो. बाजार समितीद्वारा पणन विभागाच्या वतीने शेतमाल तारण योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा दिला जातो.


शेतमाल तारण योजनेत बाजारात शेतमालास भाव मिळत नसेल तेव्हा, शेतकऱ्यांना शेतमाल तारण ठेवता येतो व त्यांची निकड भागविता येते व बाजारात दरवाढ झाल्यानंतर शेतमाल विकता येतो व तारण कर्जाची परतफेड करता येते. या योजनेमध्ये पहिल्या सहा महिन्यांत ६ टक्के, नंतरच्या सहा महिन्यांत ८ टक्के व त्यानंतरच्या कालावधीसाठी १० टक्के व्याजाची आकारणी करण्यात येते. जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींमध्ये गोदामाची व्यवस्था असल्याने अनेक शेतकरी सदर योजनेचा लाभ घेत आहेत.


काय आहे शासनाची शेतमाल तारण योजना?

  • कृषी उत्पन्न बाजार १ समितीमध्ये राज्य शासनाच्या पणन महामंडळाच्या सहकार्याने ही योजना राबविते व याद्वारे आर्थिक अडचणीतील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाच्या किमतीच्या ७० टक्के प्रमाणात व अल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करण्यात येते.
  • याद्वारे शेतकऱ्याची निकड २ भागविली जाते व कमी दराने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यावर येत नाही. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सदर योजनेचा लाभघेतल्यास नुकसान होणार नाही


उपबाजार समित्यांमध्येही शेतमाल खरेदीची सोय आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यात सर्वाधिक क्षेत्र धानाचे असल्याने अनेक शेतकरी धान मळणीनंतर शेतमालाची विक्री करतात. निवडक शेतकरी शेतमाल साठवून ठेवतात. ५ कृषी उत्पन्न बाजार समित्या जिल्ह्यात आहेत. सर्वच ठिकाणी शेतमाल तारण ठेवण्याची सोय आहे.


२४ तासांत कर्ज उपलब्ध केले जाते. शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष लाभासाठी पणन महामंडळाच्या या योजनेत बाजार समितीचा सहभाग आहे. भाव वाढल्यानंतर शेतकऱ्यांना शेतमाल विकता येतो. 


किती शेतकऱ्यांना लाभ?
जिल्ह्यात गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, अहेरी व सिरोंचा येथे कृषी उत्पन्न बाजार समित्या आहेत. मागील वर्षी गडचिरोली कृउबासमध्ये ११ शेतकऱ्यांनी शेतमाल तारण योजनेचा लाभ घेतला. यंदा ३ शेतकऱ्यांनी लाभ घेतलेला आहे.


या शेतमालासाठी योजना
या योजनेत धान पिकासह मूग, उडीद, सोयाबीन, तूर व हरभरा या शेतमालांचा समावेश करण्यात आला आहे. शेतमाल ठेवल्यापासून विक्रीपर्यंत गोदाम भाडे व इतर खर्च समितीद्वारा करण्यात येतो.


"शेतमाल तारण योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना गरजेच्या वेळी कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यात शेतकऱ्यांचा दुहेरी फायदा आहे. गडचिरोली कृउबासमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे."
- नरेंद्र राखडे, सचिव, कृउबास, गडचिरोली

Web Title: If not the price, then keep the pledge! Government's scheme for various farm products including paddy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.