मीटर रीडिंग उशिरा झाल्यास वीज ग्राहकांना बसताे फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:48+5:302021-07-23T04:22:48+5:30

अधिकच्या विजेचा वापर करणारा व्यक्ती आर्थिक परिस्थितीने चांगला राहत असल्याने त्याच्याकडून अधिकचे पैसे घेता यावे व तुलनेने गरीब व्यक्तीला ...

If the meter reading is late, the electricity consumers will be hit | मीटर रीडिंग उशिरा झाल्यास वीज ग्राहकांना बसताे फटका

मीटर रीडिंग उशिरा झाल्यास वीज ग्राहकांना बसताे फटका

अधिकच्या विजेचा वापर करणारा व्यक्ती आर्थिक परिस्थितीने चांगला राहत असल्याने त्याच्याकडून अधिकचे पैसे घेता यावे व तुलनेने गरीब व्यक्तीला कमी पैसे आकारता यावे यासाठी वीज युनिटचे पाच स्लॅब पाडण्यात आले आहेत. यात ०-१०० युनिटसाठी ३.४४ रुपये, १०१-३०० युनिटसाठी ७.३४ रुपये, ३०१-५०० युनिटसाठी १०.३६, ५०१-१००० युनिटसाठी ११.८२ रुपये व १००० युनिटच्या पुढे ११.८२ पैसे एवढा दर आकारला जातेा. महिन्याच्या त्याच तारखेला मीटर रीडिंग हाेणे अपेक्षित आहे; मात्र मीटर रीडिंग हाेण्यास आठ दिवस उशीर झाल्यास तेवढे युनिट आगाऊ जळतात. समजा एखाद्या ग्राहकाचे महिन्याला ९८ युनिट जळत असतील तर त्या सर्व युनिटला ३.४४ रुपये एवढा वीज लागू हाेते; मात्र रीडिंगला उशीर झाल्यास समजा ११५ युनिट जळाले तर १०० युनिटपर्यंत ३.४४ रुपये एवढा दर आकारला जातेा. तर उर्वरित १५ युनिटसाठी ७.३४ रुपये एवढा दर आकारला जाईल. यात १५ युनिटला जास्तीचा दर आकारला जात आहे. यात ग्राहकाची काेणतीही चूक नसताना मीटर रीडिंग उशिरा झाल्यामुळे आगाऊचे पैसे द्यावे लागतात.

बाॅक्स

महिन्याच्या त्याच दिवशी रीडिंग हाेणे आवश्यक

शहरातील प्रत्येक वाॅर्डाचा दिवस ठरवून देण्यात आला आहे. त्याच दिवशी रीडिंग हाेणे अपेक्षित आहे; मात्र रीडिंग करणारे मजूर त्या दिवशी रीडिंग न करता दाेन ते तीन दिवसांनी उशिरा रीडिंग करतात व त्याचा फटका ग्राहकांना बसतेा.

बाॅक्स

अधिकच्या युनिटवरच अधिकचा चार्ज

०-१०० युनिटसाठी ३.४४ रुपये व १०१ ते ३०० युनिटसाठी ७.३४ रुपये दर आकारला जातेा. मात्र एखाद्या वीज ग्राहकाचे समजा त्या महिन्यात १०५ युनिट जळाले तर या सर्व युनिटवर ७.३४ रुपये एवढा दर आकारला जातेा. असा गैरसमज आहे; मात्र प्रत्यक्षात तसे नसून १०० युनिटवर ३.४४ रुपये व उर्वरित ५ युनिटसाठी ७.३४ रुपये एवढा दर आकारून वीज बिल पाठविले जाते.

बाॅॅक्स

युनिटनिहाय वीज आकार

०-१०० ३.४४ रुपये

१०१-३०० ७.३४ रुपये

३०१-५०० १०.३६ रुपये

५०१-१००० ११.८२ रुपये

१००० पेक्षा अधिक ११.८२ रुपये

Web Title: If the meter reading is late, the electricity consumers will be hit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.