गावातच अंधार तर इलेक्ट्रिक वाहनांना वीज मिळेल कोठून ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2024 14:59 IST2024-10-11T14:58:07+5:302024-10-11T14:59:13+5:30
चार्जिंगचा प्रश्न होतोय गंभीर : अनेक दिवस राहतो वीज पुरवठा खंडित

If it is dark in the village, where will electric vehicles get electricity?
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : नक्षलग्रस्त जिल्हा असल्याने भारनियमनाची समस्या नाही. मात्र एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दोन ते तीन दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नाही. अशास्थितीत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करायचे कसे असा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे अजुनही दुर्गम व ग्रामीण भागात इलेक्ट्रिक वाहनांची संख्या कमी आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश गावे जंगलाने व्यापली आहेत. या गावांना रस्त्याच्या बाजुने असलेल्या जंगलातून वीज पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे थोडाही वातावरणात बदल झाला, वादळ किंवा पाऊस झाल्यास लगेच वीज पुरवठा खंडित होते. दोन ते तीन दिवस वीज पुरवठा सुरळीत होत नाही. दोन ते तीन दिवस गावांमध्ये अंधार असतो.
जिल्ह्यात पाच हजार इलेक्ट्रिक वाहने
जिल्ह्यात जवळपास पाच हजार इलेक्ट्रिक दुचाकी वाहन आहेत. चार चाकी वाहनांची संख्यासुद्धा आता वाढत असल्याचे दिसून येते.
दोन ते तीन दिवस वीज राहते गायब
वादळ किंवा पावसामुळे एकदा वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर रात्रभर वीज सुरळीत होत नाही. काही गावांचा या तर तर दोन ते तीन दिवसांशिवाय वीज पुरवठा सुरळीत होत नाही. त्यामुळे वाहन चार्जिंगचा प्रश्न निर्माण होते.
इलेक्ट्रिक वाहनांसाठी वीज कोठून आणणार?
गावातच वीज पुरवठा नसेल तर इलेक्ट्रिक वाहनांना वीज पुरवठा कोठून होणार? असा प्रश्न आहे. त्यामुळे दुर्गम व ग्रामीण भागातील नागरिक इलेक्ट्रिक वाहने खरेदी करीत नाही.
शहरात वाढतेय इलेक्ट्रिक वाहनांची संख्या
पेट्रोलच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहन परवडत असल्याचा नागरिकांचा अनुभव आहे. त्यामुळे इलेक्ट्रिक वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली शहरात पाच शोरूम आहेत. या ठिकाणी वेगवेगळ्या कंपन्यांची इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध आहेत. या वाहनांवर सरकार अनुदान देते