शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
4
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
5
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
6
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
7
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
8
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
9
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
10
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
11
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
12
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
13
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
14
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
15
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
16
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
17
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
18
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
19
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
20
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
Daily Top 2Weekly Top 5

गुंडापल्लीच्या पोलीस पाटलाचे लग्न लागल्यास आत्मदहन करणार

By admin | Updated: June 17, 2016 01:29 IST

गुंडापल्ली येथील पोलीस पाटील किशोर सीताराम सिडाम याने आपल्याशी २००२ पासून प्रेम संबंध व शारीरिक संबंध ठेवल्याने २००६ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले.

पीडित महिलेचा पत्रकार परिषदेतून इशाराआष्टी : गुंडापल्ली येथील पोलीस पाटील किशोर सीताराम सिडाम याने आपल्याशी २००२ पासून प्रेम संबंध व शारीरिक संबंध ठेवल्याने २००६ रोजी पुत्ररत्न प्राप्त झाले. परंतु ११ वर्षानंतर आपल्याला डावलून किशोर मडावी हा लगाम येथील एका तरूणीशी १७ जून रोजी विवाह करीत आहे. त्याचे लग्न लागल्यास लग्नस्थळी आपण मुलासह आत्मदहन करणार, असा इशारा सिरोंचा तालुक्याच्या कंबालपेठा येथील पीडित महिलेने गुरूवारी आष्टी येथे आयोजित पत्रकार परिषदेतून दिला. यासंदर्भात सदर महिलेने आष्टी पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल केली आहे. घेतलेल्या पत्रकार परिषदेत पीडित महिलेने सांगितले की, कंबालपेठा येथे किशोर सिडाम यांचा मामा राहत असल्याने ते येथे ये-जा करीत होते. २००२ पासून आमचे प्रेम संबंध जुळले. या प्रेम संबंधातून मे २००६ मध्ये आपल्याला पुत्ररत्न प्राप्त झाले. याची रितसर नोंद ग्रामपंचायत मादाराम येथे करण्यात आली आहे. १४ वर्षापर्यंत आपल्याशी शारीरिक संबंध ठेवून व ११ वर्षांचा मुलगा असतानाही किशोर सिडाम दुसरा विवाह १७ जून २०१६ रोजी करीत आहेत. त्यामुळे शुक्रवारी होणारा विवाह किशोर सिडाम यांनी न थांबविल्यास आपण मुलासह केरोसीन ओतून विवाहस्थळी आत्मदहन करणार, असा इशारा पीडित महिलेने दिला आहे. पत्रकार परिषदेला बसपाचे महासचिव शंकर बोरकुट, पोलीस पाटील राजन्ना गोद, तंमुस अध्यक्ष गणेश दुर्गम, मुत्तया नरवेदी, श्रीनिवास कांबळे, शंकर कोंडागुर्ले, आनंदराव वडेटी, राजन्ना दुर्गे, मनोहर कावेरी, रोशन्ना अल्लुरी, स्वामी अल्लुरी, श्रीया वेलादी, वंगो कुळमेथे यांच्यासह ५० ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)