कागदपत्रे सादर न केल्यास निराधारांचे अनुदान होणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2025 15:39 IST2025-02-15T15:38:11+5:302025-02-15T15:39:21+5:30

Gadchiroli : संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना; कागदपत्रे सादर करावे

If documents are not submitted, the subsidy for the destitute will be stopped. | कागदपत्रे सादर न केल्यास निराधारांचे अनुदान होणार बंद

If documents are not submitted, the subsidy for the destitute will be stopped.

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना विभागांतर्गत निराधारांना लाभ दिला जातो. सदर योजनेंतर्गत डिसेंबर २०२४ व जानेवारी २०२५ चे अनुदान डीबीटीद्वारे दिले जाणार आहे. कागदपत्रे सादर न केल्यास अनुदान बंद केले जाणार आहे.


निराधार योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या लाभार्थ्यांनी अद्यापही आपले आधार कार्ड, मोबाइल क्रमांक, बैंक खाते, पासबुक तसेच लाभार्थी विधवा किंवा दिव्यांग असेल तर पतीचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा दिव्यांगाचे प्रमाणपत्रासह संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. सदर कागदपत्रे जमा न केल्यास लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहू शकतात. शासनाने डीबीटी अंतर्गत लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे वेळेत सादर करावे लागणार आहे.


लाभार्थ्यांचे आधार अपडेट आवश्यक
लाभार्थ्यांचे आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक आहे. आधार व्हॅलिटेड नसल्यास लाभार्थ्यांची डीबीटी पोर्टलवर नोंदणी होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. ज्या लाभार्थ्यांनी वेळेत कागदपत्रे सादर केली नाही, अशा लाभार्थ्यांचे अनुदान कागदपत्रांअभावी फेब्रुवारी २०२५ अखेर पासून बंद होणार आहे.


"डीबीटीकरिता शिल्लक लाभार्थ्यांची यादी संबंधित ग्राम महसूल अधिकारी कार्यालयाकडून प्राप्त करून घ्यावी. लाभार्थ्यांना अडचण आल्यास संबंधित कोतवाल व ग्राम महसूल अधिकारी यांची मदत घ्यावी."
- अविश्यांत पंडा, जिल्हाधिकारी


फेब्रुवारीपासून थेट खात्यात रक्कम
फेब्रुवारी महिन्यापासून निराधारांच्या बँक खात्यात डीबीटीद्वारे थेट रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे बँक खात्याला आधार लिंक असणे आवश्यक आहे.


जिल्ह्यातील लाभार्थी संख्या
राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना - ३७,८७७
राष्ट्रीय कुटुंब सहाय्य योजना - ३४४
राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना - ३,३२५
राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना - ४८१
संजय गांधी निराधार योजना (सर्वसाधारण) - १६०४०
संजय गांधी निराधार योजना (अनु. जाती) - ४,७१८
संजय गांधी निराधार योजना (अनु. जमाती) - १०,०५५
श्रावण बाळ सेवा योजना (सर्वसाधारण) - ३७,९०६
श्रावण बाळ सेवा योजना (अनु. जाती) - ११,०४६
श्रावण बाळ सेवा योजना (अनु. जमाती) - २३,१६९

Web Title: If documents are not submitted, the subsidy for the destitute will be stopped.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.