पतीने सुपारी देऊन केली कनिकाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2022 05:00 IST2022-06-08T05:00:00+5:302022-06-08T05:00:37+5:30

संजयची १० दिवसांची पोलीस कोठडी ६ जूनला संपली. त्याला  अहेरी न्यायालयाने  न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. संजय बिश्वासचा पंचायत संकुलमध्ये अनेक वर्षांपासून फोटो स्टुडिओचा व्यवसाय होता. पत्नीसह तिथेच राहणे व व्यवसाय करणे असा त्यांचा नित्यक्रम सुरू असताना २३ मेच्या रात्री कनिकाची हत्या करण्यात आली. 

Husband kills Kanika with betel nut | पतीने सुपारी देऊन केली कनिकाची हत्या

पतीने सुपारी देऊन केली कनिकाची हत्या

लाेकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : येथे फोटो स्टुडिओचा व्यवसाय करणारे संजय बिश्वास (३५) यांनीच त्यांची पत्नी कनिका (३२) हिची सुपारी देऊन हत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी आरोपी पती संजय याला आधीच पोलिसांनी अटक केली होती. त्याचा पीसीआर आटोपल्याने त्याची चंद्रपूर जेलमध्ये रवानगी करण्यात आली असून, या प्रकरणातील इतर आरोपींचा आता शोध सुरू आहे. 
संजयची १० दिवसांची पोलीस कोठडी ६ जूनला संपली. त्याला  अहेरी न्यायालयाने  न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. संजय बिश्वासचा पंचायत संकुलमध्ये अनेक वर्षांपासून फोटो स्टुडिओचा व्यवसाय होता. पत्नीसह तिथेच राहणे व व्यवसाय करणे असा त्यांचा नित्यक्रम सुरू असताना २३ मेच्या रात्री कनिकाची हत्या करण्यात आली. 
एटापल्लीचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, ठाणेदार विजयानंद पाटील यांनी अल्पावधीतच या खुनाचा छडा लावण्यात यश मिळविले. अधिक तपास अधिकारी एपीआय मंदार पुरी करीत आहेत. यात उपनिरीक्षक रविकांत काबंळे व पोलिसांनी परिश्रम घेतले.

अखेर आरोपीने दिली हत्येची कबुली 
-    घटनेच्या दिवशी बिश्वास दाम्पत्याचा १० वर्षांचा मुलगा एटापल्लीच्या बंगाली वॉर्डातील कनिकाच्या आईच्या घरी होता. तर संजयने बाहेरगावी गेल्याचा देखावा केला. कनिका एकटीच घरात होती. त्याच रात्री कनिकाची हत्या करण्यात आली. संजयने दुसऱ्या दिवशी घरी आल्यानंतर माझ्या पत्नीची हत्या झाली, असा देखावा केला. पोलिसांनी संशयावरून २८ मे रोजी संजयला अटक करून १० दिवसांची पोलीस कोठडी मिळविली. यात त्याने आपणच पत्नीची हत्या सुपारी देऊन केल्याची कबुली दिली. हत्या करणारा आरोपी परप्रांतीय असून, पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

 

Web Title: Husband kills Kanika with betel nut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.