शेकडो युवक, युवती धावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:20 IST2018-03-01T00:20:19+5:302018-03-01T00:20:19+5:30
स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी मंगळवारला सकाळी ८ वाजता लक्ष्मी गेट परिसरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नगरसेवकांसह शेकडो युवक, युवती धावल्या.

शेकडो युवक, युवती धावल्या
ऑनलाईन लोकमत
चामोर्शी : स्थानिक नगर पंचायत प्रशासनाच्या वतीने २७ फेब्रुवारी रोजी मंगळवारला सकाळी ८ वाजता लक्ष्मी गेट परिसरात मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत नगरसेवकांसह शेकडो युवक, युवती धावल्या.
उपविभागीय अधिकारी नितीन सदरगीर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉन स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी तहसीलदार अरूण येरचे, पोलीस निरीक्षक गोरख गायकवाड, नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, मुख्याधिकारी अर्शिया जुही, सभापती विजय शातलवार, अविनाश चौैधरी, मंदा सरपे, नगरसेविका प्रज्ञा उराडे, मंजूषा रॉय, नगरसेवक विजय गेडाम, सुमेध तुरे पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे तसेच प्रा. संजय मस्के, अतुल येलमुले यांच्यासह नगर पंचायतीचे कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
क्रिकेटचा उद्घाटनीय सामना कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयाच्या प्रांगणात न्यायालयीन कर्मचारी, वकील संघाच्या विरूद्ध पोलीस कर्मचाऱ्यांच्या संघात झाला. सदर सामना न्यायालयीन कर्मचारी, वकील संघाने जिंकला. व्हॉलिबॉल व बॅटमिंटन स्पर्धा मुख्य बाजार चौकात पार पडल्या.