मिनी मॅराथॉन स्पर्धेत धावले शेकडो विद्यार्थी
By Admin | Updated: January 13, 2016 01:55 IST2016-01-13T01:55:08+5:302016-01-13T01:55:08+5:30
नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ...

मिनी मॅराथॉन स्पर्धेत धावले शेकडो विद्यार्थी
नगराध्यक्षांच्या हस्ते झाले बक्षीस वितरण : युवा सप्ताहाचे औचित्य साधून आयोजन
गडचिरोली : नामदेवराव पोरेड्डीवार कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने युवा सप्ताहाचे औचित्य साधून मंगळवारी मिनी मॅराथॉन स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत शेकडो तरूण-तरूणींनी भाग घेऊन दौड लावली.
गडचिरोलीच्या नगराध्यक्ष अश्विनी धात्रक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपव्यवस्थापक टी. डब्ल्यू. भुरसे यांनी इंदिरा गांधी चौकातून मॅराथॉन स्पर्धेला हिरवी झेंडी दाखविली. त्यानंतर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष डॉ. अश्विनी धात्रक यादव यांच्या हस्ते झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरदार पटेल मेमोरिअल ट्रस्टचे उपाध्यक्ष शफीक अहेमद होते. या कार्यक्रमाला डॉ. झेड. जे. खान, प्रशांत पोटदुखे, विनोद दत्तात्रेय, विश्राम होकम, प्राचार्य डॉ. प्रविण पोटदुखे, प्रो. अंजय्या येरला आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. रागिनी पाटील, प्रा. तृप्ती मल यांनी केले तर आभार प्रा. उज्वला म्हशाखेत्री यांनी मानले. (प्रतिनिधी)