शहरं
Join us  
Trending Stories
1
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
2
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
3
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
4
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
5
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
6
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
7
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
8
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
9
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
10
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
11
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
12
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
13
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
14
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
15
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
16
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
17
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
18
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
19
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
20
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 

आरमाेरी तालुक्यातील शेकडाे वयाेवृद्धांची काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 5:00 AM

विलास चिलबुले  लाेकमत न्यूज नेटवर्क आरमोरी : येथील कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत ५० पेक्षा अधिक वय असलेल्या ४०२ कोरोनाग्रस्तांनी ...

ठळक मुद्देहिंमत कायम ठेवून सकारात्मक विचारांनी मिळविला काेराेनावर विजय

विलास चिलबुले लाेकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : येथील कोविड केअर सेंटरमधून आतापर्यंत ५० पेक्षा अधिक वय असलेल्या ४०२ कोरोनाग्रस्तांनी कोरोनावर मात केली आहे. सकारात्मक विचार व हिंमत ठेवून उपचार घेतल्यास कोरोनामधून बरे होता येते, अशी प्रतिक्रिया बरे झालेल्या रुग्णांनी व्यक्त केली आहे. आरमोरी येथील रहिवासी असलेले माजी आमदार हरिराम वरखडे (वय ७७ वर्षे) हे गृहविलगीकरणात राहून तर ताराबाई जगन्नाथ बेहरे (वय ७४ वर्षे) या कोविड केअर सेंटरमधून उपचार घेऊन कोरोनावर मात करून घरी परतलेल्या आहेत. कोरोनाचा संसर्ग झाल्यास घाबरण्याची गरज नसल्याचे मत डाॅक्टरांकडून व्यक्त करण्यात येत आहे. थोडीफार लक्षणे असल्यास तत्काळ कोरोना तपासणी करून योग्य ते उपचार करून घ्यावे, जेणेकरून घरच्यांना कोरोना होण्यापासून थांबविता येईल, असे आवाहन डाॅक्टरांनी व्यक्त केले आहे. ऑक्टोबर २०२० पासून आरमोरी कोविड केअर सेंटरमधून ५० पेक्षा अधिक वय असलेल्या ४०२ नागरिकांनी काेराेनावर मात केली आहे. यामध्ये १६८ महिला तर २२७ पुरुष आहेत. ८० च्या वर वय असलेले ५ पुरुष व २ महिलांचा समावेश आहे. १८ ते ५० वय असलेले ६७० कोरोना रुग्ण बरे झालेले आहेत. ४५ वर्षे वयावरील नागरिकांनी लस घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.काेराेना झाल्यानंतर अनेक नागरिक धास्तावून जातात. त्यामुळे राेगप्रतिकारक क्षमता कमी हाेण्यास मदत हाेते. त्यामुळे नागरिकांनी सकारात्मक विचार करून हिमतीने काेराेनाविराेधात लढा देण्याचा निर्धार केल्यास शरीरात ॲटीबाॅडी तयार हाेतात. या ॲटीबाॅडी व्यक्तीला काेराेनावर विजय मिळविण्यास मदत करतात. एखाद्या व्यक्तीला काेराेनाचा संसर्ग झाल्यानंतर कुटुंबिय, नातेवाईक व मित्रांनी धीर व हिंमत देण्याची गरज आहे. 

लसीकरणाचे प्रमाण वाढण्याची गरजकोरोना आटोक्यात आणायचा असेल तर लस घेणे अत्यंत आवश्यक  आहे. लसबाबत अनेक ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांमध्ये गैरसमज पसरलेला आहे.  गैरसमज काढण्याकरिता शहरातील लोकप्रतिनिधी, नगरसेवक, गावातील सरपंच, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन जनजागृती करावी. जास्तीत जास्त नागरिकांनी लसीकरण डोस घेणे आवश्यक आहे.

आतापर्यंत फक्त ६ हजार ४६ नागरिकांनी लसीचा डोस घेतला आहे. यामध्ये ४ हजार ५१७ नागरिकांनी पहिला डोस पूर्ण केला आहे. १ हजार ५२९ नागरिकांनी दुसरा लसीकरण डोस घेतला आहे. १८ ते ४४ वयाेगटातील ९१८ नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. -  डॉ. आनंद ठिकरे, तालुका आराेग्य अधिकारी, गडचिराेली

कोरोनाची साखळी तोडण्याकरिता तपासणी करणे आवश्यक आहे. काेराेना झाल्यानंतर घाबरण्याचे कारण नाही.  मला खोकला व ताप आल्याने मी तत्काळ तपासणी केली. त्यात मी पाॅझिटिव्ह आल्याने मी सकारात्मक विचाराने उपचार प्रक्रिया केली व आज मी बरा झालो. सकारात्मक विचाराने काेणीही बरा हाेईल.- हरीराम वरखडे, माजी आमदार

माझे वय ७४ वर्षे आहे. माझी तब्येत बिघडत गेली होती. ताप, खोकला येत होता, श्वास घेताना त्रास होऊ लागला. लगेच मुलाने कोरोना तपासणी करून मला काेविड केअर सेंटरमध्ये ठेवले. तेथे योग्य प्रकारे उपचार झाल्याने आज माझी प्रकृती ठणठणीत आहे. - ताराबाई जगन्नाथ बेहरे

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या