शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

शेतातील कचरा जाळल्यास सुपीकता कशी टिकणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2024 14:10 IST

कृषी विभागाचा सल्ला : जाळपोळीमुळे नत्राची मात्रा होते कमी

लोकमत न्यूज नेटवर्कवैरागड : खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेती कचरामुक्त ठेवण्याच्या नावाखाली शेतीतील जुन्या पिकाची धसकटे, तणस, पालापाचोळा शेतात जाळून टाकला जातो. यामुळे कचरा तर नष्ट होतोच शिवाय शेतातील धसकटे जाळल्याने शेतीची सुपीकता वाढते, असा गैरसमज आहे. तणस, धसकटे जाळल्याने शेतीतील सुपीकता नष्ट होते. शेतकऱ्यांनी शेतात धसकटे, पालापाचोळा जाळू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

शेतात रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खताची मात्रा वाढवणे आवश्यक असताना शेतकरी गवतवर्गीय पालापाचोळा, गहू, धान पिकाचे धसकट जाळून टाकतात. त्यामुळे जमिनीतील नत्राची मात्रा कमी होते. स्वच्छ दिसणारे शेत म्हणजे सुपीक शेत नाही. जमिनीतील गवतवर्गीय पालापाचोळा, पिकाची धसकटे जाळून न टाकता ती नांगरणीत जमिनीत मुरवल्याने त्यापासून सेंद्रिय खताची मात्रा वाढते व उत्पन्नाची पातळीसुद्धा वाढते. सेंद्रिय खतामधून जमिनीला लागणारे नत्र, स्फुरद, पालाश ही तिन्ही अन्नद्रव्य मिळतात. शेणखत, कंपोस्ट खत, जनावराचे शेणखत, मानवी मल, कोंबड्याची विष्ठा, भुईमुगाची पेंड, कडुनिंबाचा पाला हे सर्व घटक शेतीत मोठ्या प्रमाणात सेंद्रिय खते निर्माण करतात; पण शेतकरी या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात व शेतात सेंद्रिय खताची मात्रा मोठ्या प्रमाणात वापरत नसल्याने उत्पन्नावर परिणाम होतो.

राज्य सरकारची डॉ. पंजाबराव देशमुख सेंद्रिय मिशन आणि केंद्र सरकारची नैसर्गिक शेती मिशन या दोन महत्त्वाच्या योजना या खरीप हंगामात राबविल्या जाणार आहेत. शेतीतील सेंद्रिय खताची मात्रा कशी वाढवता येईल व शाश्वत शेतीकडे शेतकऱ्यांचा ओढा वाढविण्यासाठी व रासायनिक खतांचा होणारा परिणाम, वारेमाप खर्च कमी करण्यासाठी कृषी विभागामार्फत या योजना शेतकरी गटामार्फत राबविल्या जाणार आहेत.- नीलेश गेडाम, तालुका कृषी अधिकारी, आरमोरी

ज्या काळात रासायनिक खते नव्हती आणि असली तरी त्याचे प्रमाण कमी होते. तेव्हा शेतकरी पिकाचे अवशेष, हिरवळीचे खत, शेतातील तण आदी कुजवून खत तयार करत असत. यामुळे शेताचा पोत टिकून असायचा. जमिनीची सुपीकता अनेक वर्ष कायम असायची. मात्र, रासायनिक खतांमुळे जमिनीची सुपीकता कमी होत आहे.- केशव गेडाम, शेतकरी, वैरागड 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रGadchiroliगडचिरोलीfarmingशेती