पूर, भूकंप, चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वतःचा जीव कसा वाचवायचा ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 17:05 IST2025-04-03T17:02:39+5:302025-04-03T17:05:12+5:30

Gadchiroli : ८४०.७ मिलिमीटर जिल्ह्याचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान आहे.

How to save your life in a natural disaster like flood, earthquake, cyclone? | पूर, भूकंप, चक्रीवादळासारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये स्वतःचा जीव कसा वाचवायचा ?

How to save your life in a natural disaster like flood, earthquake, cyclone?

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली :
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ), नागपूर यांच्या पथकाद्वारे जिल्ह्यात १ ते ११ एप्रिल २०२५ या कालावधीत आपत्ती व्यवस्थापन जनजागृती तसेच प्रात्यक्षिक आणि सराव घेतला जात आहे. यात पूर, भूकंप व चक्रीवादळासारख्या संकटात स्वतःचा व इतरांचा जीव कसा वाचवावा, याबाबतचे प्रात्यक्षिक २ एप्रिलला नियोजन समिती सभागृहात करण्यात आले.


जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील सूर्यवंशी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी नीलेश तेलतुंबडे, एनडीआरएफचे पोलिस निरीक्षक ब्रिजेशकुमार यादव हजर होते.


यंत्रणांचा सहभाग
प्रशिक्षणामध्ये कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी या तालुक्यांतील महसूल, पोलिस, आरोग्य व महावितरण विभागातील बचाव पथक तसेच स्थानिक आपदा मित्रांनी सहभाग घेतला.


याबाबत दिले प्रशिक्षण
भूकंप, भूस्खलन, पूर, त्सुनामी, चक्रीवादळ, वीज पडणे, दुष्काळ, उष्णतेच्या लाटा, शीतलहरी, घटना प्रतिसाद प्रणाली, आपदा मित्रांची भूमिका, कृत्रिम श्वासोच्छवास, आपत्कालीन लिफ्टिंग आणि हालचाल, फायर सेफ्टी, जैविक, रासायनिक व आण्विक आपत्ती, गर्दी व्यवस्थापन, स्ट्रेचर तयार करणे, पीपीई किटचे योग्य वापर, प्राथमिक उपचार अशा अनेक महत्त्वपूर्ण बाबींवर प्रशिक्षण देण्यात आले.

Web Title: How to save your life in a natural disaster like flood, earthquake, cyclone?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.