कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 05:00 IST2021-05-13T05:00:00+5:302021-05-13T05:00:28+5:30

काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत लक्षणे दिसूनही नागरिक चाचणी करून घेत नव्हते. उलट गावातच उपचार करून घेण्याकडे त्यांचा कल राहत हाेता. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे नागरिकांमध्ये काेराेनाची भीती निर्माण हाेऊन चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.

How to stop the third wave of corona? | कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?

कशी रोखणार कोरोनाची तिसरी लाट?

ठळक मुद्देचाचण्या वाढल्या, पण लसीकरणाची गती मंदच, लसीच्या पुरवठ्याअभावी अनेक जण वंचित

लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत नागरिकांमध्ये काेराेना संक्रमणाविषयी बरीच जागृती निर्माण झाली आहे. काेराेनाची लक्षणे दिसून आल्यानंतर नागरिक स्वत:हून काेराेना चाचणी करून घेण्यास पुढे येत आहेत. त्यामुळे चाचण्या करून घेण्याचे प्रमाण वाढले आहे. काेराेनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी आता लसीकरणाचीही गती वाढविण्याची गरज आहे; पण लस उपलब्ध होत नसल्याने जिल्हाभरातील नागरिकांचे लसीकरण कधी पूर्ण होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
काेराेनाच्या सुरुवातीच्या कालावधीत लक्षणे दिसूनही नागरिक चाचणी करून घेत नव्हते. उलट गावातच उपचार करून घेण्याकडे त्यांचा कल राहत हाेता. मात्र, काेराेनाच्या दुसऱ्या लाटेत काेराेनामुळे मृत्यू हाेणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे नागरिकांमध्ये काेराेनाची भीती निर्माण हाेऊन चाचण्या करण्याचे प्रमाण वाढले आहे.
१ एप्रिल ते १० मे या कालावधीत सुमारे ५७ हजार ९१७ नागरिकांची रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आली. चाचण्या वाढल्याने रुग्णाचे वेळीच विलगीकरण करणे शक्य झाल्याने काेराेनाची लाट काही प्रमाणात थोपविणे शक्य झाले आहे.
काेराेना चाचण्यांचे प्रमाण वाढले ही जमेची बाब आहे. त्याचबराेबर लसीकरणाची गती वाढविण्यासाठीही आराेग्य विभागाला मेहनत घ्यावी लागणार आहे.
ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांमध्ये अजूनही लसीविषयी गैरसमज असल्याने ते लस घेण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अनेक केंद्रांवर लस पडून आहेत. हा गैरसमज दूर झाल्याशिवाय नागरिक लस घेणार नाहीत. नागरिकांमधील गैरसमज दूर करण्यासाठी आराेग्य विभागाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

सव्वा महिन्यात ३२ टक्के टेस्टिंग
काेराेनाच्या सुरुवातीपासून ते १० मेपर्यंत जिल्हाभरातील १ लाख ८२ हजार १५७ नागरिकांच्या रॅपिड अँटिजन टेस्ट करण्यात आल्या आहेत. त्यापैकी १ एप्रिल ते १० मे या कालावधीत सुमारे ५७ हजार ९१४ नागरिकांच्या टेस्ट झाल्या आहेत. टक्केवारीमध्ये हे प्रमाण ३१.७९ टक्के एवढे आहे.

ग्रामीण भागात काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवा
एखादा रुग्ण आढळून आल्यानंतर यापूर्वी आराेग्य विभाग काॅन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवीत हाेता. आता मात्र काॅन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम पूर्णपणे ठप्प आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये लसीविषयी जनजागृती निर्माण करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेण्याची गरज आहे.

नागरिकांसाठी ग्रामीण भागात लसीकरण केंद्र वाढवा
१८ वर्षांपेक्षा अधिक वयाच्या नागरिकांमध्ये लसीकरणाबाबत उत्साह दिसून येत आहे. मात्र, या नागरिकांसाठी केवळ शहर व तालुकास्तरावरच लसीकरण केंद्रे ठेवण्यात आली आहेत. ग्रामीण भागातही लसीकरण केंद्रे वाढविण्याची गरज आहे.

- तर रूग्णसंख्या पुन्हा वाढणार
सध्या लसींचा तुटवडा जिल्हाभरात जाणवत आहे. टप्प्याटप्प्याने लसींचा पुरवठा हाेत असला तरी ताे पुरेसा नाही. याच पद्धतीने लसीकरण रखडल्यास काेराेना रूग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

 

Web Title: How to stop the third wave of corona?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.