जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:23 IST2021-07-03T04:23:18+5:302021-07-03T04:23:18+5:30

बाॅक्स.... गावात पुन्हा पेटताहेत चुली - उज्ज्वला गॅस याेजनेपूर्वी ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांकडे गॅस कनेक्शन नसल्याने ते चुलीवरच स्वयंपाक ...

How to live Domestic gas cylinders go up by Rs 25 again | जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!

जगायचे कसे? घरगुती गॅस सिलिंडर पुन्हा २५ रुपयांनी महागले!

बाॅक्स....

गावात पुन्हा पेटताहेत चुली

- उज्ज्वला गॅस याेजनेपूर्वी ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांकडे गॅस कनेक्शन नसल्याने ते चुलीवरच स्वयंपाक करीत हाेते. उज्ज्वला याेजनेंतर्गत सिलिंडर उपलब्ध झाला. त्या वेळी किमती कमी हाेत्या. त्यामुळे बहुतांश कुटुंब किमान सायंकाळचा तरी स्वयंपाक गॅसवर करीत हाेते. आता मात्र गॅसच्या किमती प्रचंड वाढल्याने पुन्हा चुलीवर स्वयंपाक केला जात आहे.

- ग्रामीण भागात सिलिंडरचे ग्राहक वाढल्याने गॅस एजन्सीजने गावापर्यंत सिलिंडर पाेहोचविण्याची व्यवस्था केली आहे. पूर्वी माेठ्या प्रमाणात नागरिक गॅस सिलिंडर भरत हाेते. आता मात्र चुलीवर स्वयंपाक सुरू झाल्याने गॅस रिफिल करण्याचे प्रमाण कमी झाले आहे.

काेट....

दाेन वर्षांपूर्वी गॅस सिलिंडर ५०० ते ६०० रुपयांना मिळत हाेता. वीज महाग असल्याने विजेच्या गिजरऐवजी गॅस गिजर खरेदी केला. आता गॅसही महाग झाला आहे. आंघाेळीला पाणी गरम करण्यासाठी बराचसा गॅस खर्च हाेतो.

- वर्षा साेनवाने, गृहिणी

काेट....

इतर वस्तूंच्या महागाईबराेबरच सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. महिन्याला ९०० रुपये खर्च हाेत असल्याने बजेट बिघडत चालले आहे. शहरात गॅसशिवाय पर्याय नाही. त्यामुळे केंद्र शासनाने गॅसवर जास्त सबसिडी द्यावी.

- सुरेखा सूर्यवंशी, गृहिणी

बाॅक्स....

सबसिडी मात्र केवळ ४० रुपये

मागील दहा वर्षांपासून सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. मात्र सबसिडी केवळ ४० रुपयेच जमा हाेत आहे. पूर्वी किमती वाढल्या तर सबसिडी अधिकची मिळत हाेती. आता मात्र सबसिडी कायम आहे.

बाॅक्स....

एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० मध्ये झालेली वाढ

एप्रिल - ७९५

मे - ५९५

जून - ५९५

जुलै - ५९५

सप्टेंबर - ६५०

ऑक्टाेबर - ६५०

नाेव्हेंबर - ६५०

डिसेंबर - ७५०

बाॅक्स....

जानेवारी २०२१ ते जुलैमध्ये झालेली भाववाढ

जानेवारी - ७५०

फेब्रुवारी - ८५३

मार्च - ८४६

एप्रिल - ८४६

मे - ८६५

जून - ८६५

जुलै - ८९१

Web Title: How to live Domestic gas cylinders go up by Rs 25 again