आदर्श शिक्षक व गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2017 23:59 IST2017-08-22T23:59:27+5:302017-08-22T23:59:44+5:30
प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी व देसाईगंजची ५४ वी सभा देसाईगंज येथील सांस्कृतिक भवनात रविवारी पार पडली.

आदर्श शिक्षक व गुणवंतांचा सत्कार
लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था आरमोरी व देसाईगंजची ५४ वी सभा देसाईगंज येथील सांस्कृतिक भवनात रविवारी पार पडली. या सभेत आदर्श पुरस्कारप्राप्त शिक्षक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अध्यक्षस्थानी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष धनपाल मिसार होते. प्रमुख अतिथी म्हणून उपाध्यक्ष रेमाजी चरडुके, सचिव जयंत राऊत, कोषाध्यक्ष रामदास मसराम, संचालक संजय बिडवाईकर, मेघराज बुराडे, कैलास टेंभूर्णे, रेश्मा तितिरमारे, गुणवंत हेडाऊ, दिनकर राऊत, विरेंद्र मोहुर्ले, एकनाथ पिल्लारे, गुलाब मने, दिगांबर करंबे, किशोर पिंपळकार, इंदिरा चापले आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्त शिक्षक राजेंद्र साखरे, इस्माईल शेख, प्रमोद चिडे, वामन महाजन, उद्धव वानखेडे, विजय ठेंगरी, घनश्याम मैंद, जगदीश बद्र्रे , गोपीनाथ नेवारे दादाजी मारबते, मारोती बुल्ले, भगवान कन्नाके, मंदा येनुरकर, अमेश ठाकरे, प्रभाकर मेश्राम, दुधराम रामटेके, मारोती बगमारे, मधुकर कोटगले, श्रीकांत चल्लेवार, या सेवानिवृत्त शिक्षकाचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यानंतर जिल्हा आदर्श पुरस्कार प्राप्त शिक्षक प्रभाकर मेश्राम व नरेश बन्सोड यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला.
सेट परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थिनी मंगला लोखंडे, यशश्री नाकाडे, रियाज शेख, तेजस हेडाऊ, अभिषेख टेंभूर्णे, अंकुश बांडे, जानवी शिवणकर, माधुरी हेडाऊ, मोहनीश मेश्राम, शरयू राऊत आदी विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व रोख रक्कम देवून सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षक, विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.