पीकअपच्या धडकेत आॅटोचालक ठार
By Admin | Updated: November 13, 2016 02:01 IST2016-11-13T02:01:11+5:302016-11-13T02:01:11+5:30
भरधाव वाहनाने धडक दिल्याने आॅटोचालक घटनास्थळीच ठार झाल्याची घटना

पीकअपच्या धडकेत आॅटोचालक ठार
आष्टी : भरधाव वाहनाने धडक दिल्याने आॅटोचालक घटनास्थळीच ठार झाल्याची घटना शनिवारी सकाळी दहा वाजताच्या सुमारास गोंडपिपरी-आष्टी मार्गावरील सुरगाव आणि आयटीआयजवळ घडली.
सुकलाल वर्धाभाई डोंगरे (३८) रा. रामपूर असे मृतक आॅटोचालकाचे नाव आहे. शनिवारी सकाळच्या सुमारास सुकलाल आपला एमएच ३३-३४३ क्रमांकाचा आॅटो घेऊन आष्टीवरून चंद्रपूरकडे जात होता. यावेळी भाजीपाला घेऊन चंद्रपूरकडून आष्टीकडे भरधाव वेगाने येत असलेल्या पीकअप वाहनाने आॅटोला धडक दिली. यात आॅटोचालक सुकलाल जागीच ठार झाला. सुकलाल हा आष्टीत सुपरिचित होता. त्यामुळे आष्टीत सर्र्वत्र शोककळा पसरली आहे. सुकलालच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन भावंड, आईवडील व बराच मोठा आप्त परिवार आहे. (प्रतिनिधी)