पाण्यासाठी नगर पंचायतवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:37 IST2021-09-03T04:37:56+5:302021-09-03T04:37:56+5:30
कुरखेडा शहरातील आंबेडकर वाॅर्ड, आझाद वाॅर्ड व श्रीरामनगर (तळेगाव रोड) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा नळ योजनेची मोटार जळाली आहे. पाणीपुरवठा ...

पाण्यासाठी नगर पंचायतवर धडक
कुरखेडा शहरातील आंबेडकर वाॅर्ड, आझाद वाॅर्ड व श्रीरामनगर (तळेगाव रोड) येथील सार्वजनिक पाणीपुरवठा नळ योजनेची मोटार जळाली आहे. पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाण्याकरिता पायपीट करावी लागत आहे. या मानसिक व शारीरिक त्रासामुळे संतप्त होत आज येथील नागरिकांनी माजी नगरसेवक ॲड. उमेश वालदे यांचा नेतृत्वात नगर पंचायतवर धडक दिली. प्रशासकीय अधिकारी प्रवीण गिरमे व शाखा अभियंता आरिफ शेख यांचाशी चर्चा करीत तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. यावेळी माजी नगरसेवक पुंडलिक देशमुख, संतोष खोब्रागडे, राजकुमार भोंडे, अज्जू सय्यद, सागर निरंकारी, आसिफ शेख, रामदिन साहारिया, प्रमोद खोब्रागडे, मधुकर वारजूरकर,नरेश दहिकर, मोरेश्वर राऊत, सोनू गुवाल, रवींद्र साखरे, सागर गुवाल, निखिल जांभूळकर, मोंटी चौधरी, जयंत गरमडे, पंकज राऊत, आकाश कन्नाके, प्रकाश ठाकरे, प्रितम वालदे, सुभाष ठाकरे, शामराव रामटेके, वामन तडोसे, राहुल शेडमाके, अस्सू शेख, ईस्माईल पठाण, शैलैश धुर्वे, मनोज बुंदेले, अमित खोब्रागडे, उमदेव देशमुख, सतीश हडप इत्यादी उपस्थित होते.
020921\img20210902112942_01.jpg
नगर पंचायत मध्ये चर्चा करीत निवेदन देताना नागरिक