मग्रारोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:35 IST2021-03-19T04:35:22+5:302021-03-19T04:35:22+5:30
निवेदनात म्हटले की, दरवर्षी कंत्राटी कर्मचाऱ्यांना ११ महिन्याचे नियुक्ती आदेश देण्यात येत असतात. ३१ मे २०२१ पर्यत कामाचे आदेश ...

मग्रारोहयो कंत्राटी कर्मचाऱ्यांना कामावर घ्या
निवेदनात म्हटले की, दरवर्षी कंत्राटी कर्मचाऱ्यांना ११ महिन्याचे नियुक्ती आदेश देण्यात येत असतात. ३१ मे २०२१ पर्यत कामाचे आदेश असताना २८ फेब्रुवारी २०२१ ला सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना भारमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे सदर कर्मचाऱ्यांना जीवन कसे जगावे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. सेवेतून भारमुक्त केल्याने कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे. शासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला आहे. जिल्ह्यात कोणत्याही दळणवळणाच्या पुरेशा सुविधा नाही तसेच इंटरनेट कनेक्टिव्हिटीचा अभाव अशा प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत कंत्राटी कर्मचारी अहोरात्र काम करून या योजनेला बळकटी आणण्यासाठी काम केले आहे. मात्र असे असताना सुद्धा कर्मचाऱ्यांना सेवेतून भारमुक्त केले आहे. या कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत घ्यावे, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी कंत्राटी कर्मचारी स्वप्नील रायपुरे, शैलेश लाड, राजू भुरे, दिलीप सोमनकर, प्रभाकर सातपुते, देवेंद्र चलाख, संजय खोबे, धनंजय सोमनकर, मोहन बोदेले, गंगेश अल्लीवार, सुधीर सोमनकर, सूरज नैताम उपस्थित होते.