शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

तीन टप्प्यात शेतकऱ्यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 00:57 IST

यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीने ग्रस्त पिकांच्या नुकसानासाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीपैकी पहिला हप्ता अखेर जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे.

ठळक मुद्देपहिला हप्ता ९.२० कोटींचा : कोणत्या गावाला आधी मदत द्यायची? प्रशासनापुढे यक्षप्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या खरीप हंगामात मावा-तुडतुडे आणि बोंडअळीने ग्रस्त पिकांच्या नुकसानासाठी शासनाने जाहीर केलेल्या मदतीपैकी पहिला हप्ता अखेर जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाला आहे. धान आणि कापसाच्या नुकसानीसाठी दिल्या जाणाऱ्या एकूण ३४ कोटी ५३ लाख रुपयांच्या मदतीपैकी तूर्त ९ कोटी २० लाख रुपयेच उपलब्ध झाले आहेत. ती रक्कम वाटप केल्यानंतरच दुसऱ्या टप्प्यातील रक्कम मिळणार आहे. त्यामुळे ही मदत प्रथम कोणत्या गावाला वाटायची आणि नंतरच्या टप्प्यात कोणाला घ्यायचे हे ठरविण्याचा करण्याचा यक्षप्रश्न प्रशासकीय यंत्रणेपुढे उभा ठाकला आहे.शेतकºयांना आता नवीन खरीप हंगामाचे वेध लागले आहेत. त्यामुळे शेतकरी बियाणे, खत, मजुरी यासाठी पैशाची जुळवाजुळव करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे सर्वच शेतकऱ्यांना आता पैशाची गरज आहे. गेल्या हंगामात खरीप पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले. यात धानाच्या पिकावर मावा-तुडतुडा तर कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाला होता. सर्व्हेक्षणानंतर शासनाने गेल्या हिवाळी अधिवेशनात मदत देण्याचा निर्णय जाहीर केला.जिरायती शेतीसाठी हेक्टरी ६८०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) तर बागायती शेतीसाठी हेक्टरी १३ हजार ५०० रुपये (केवळ २ हेक्टरसाठी) अशी मदत मिळणार आहे. ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झालेलेच शेतकरी या मदतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात ६९ हजार ५१५ शेतकरी मदतीची रक्कम मिळण्यासाठी पात्र ठरले असून त्यांना ३४ कोटी ५५ लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. पण सर्व शेतकऱ्यांना मदतीची रक्कम एकाचवेळी मिळणार नसल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना काही महिने ताटकळत राहावे लागणार आहे.तीन टप्प्यात वाटप केल्या जाणाऱ्या रकमेपैकी गडचिरोली जिल्ह्यासाठी पहिला टप्प्यात ११ कोटींची रक्कम मंजूर झाली. मात्र प्रत्यक्षात ९ कोटी २० लाख एवढीच रक्कम प्राप्त झाली. ही रक्कम आता कोणत्या गावांना वाटायची हे ठरविताना प्रशासनाला मोठी कसरत करावी लागणार आहे.पूर्ण मदत मिळण्यास लागणार विलंबपहिल्या टप्प्याची रक्कम जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर सर्व तहसीलदारांच्या खात्यात स्थानांतरित केली जाईल. तहसीलदारामार्फत ती रक्कम प्रथम टप्प्यासाठी निवडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. नंतर त्या शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध केल्यानंतर शासनाकडून दुसऱ्या टप्प्याची मदत दिली जाईल. ती वाटप झाल्यानंतर तिसऱ्या टप्प्याची मदत मिळेल. अशा प्रकारे संपूर्ण मदत मिळण्यासाठी अर्धाअधिक पावसाळा निघून जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.केंद्राच्या मदतीअभावी उशीरराज्यात रोगराईमुळे नुकसान झालेल्या शेतकºयांना मदत देण्यासाठी राज्य शासनाने केंद्र सरकारकडे मदतीची मागणी केली होती. मात्र केंद्राकडून अपेक्षित मदत मिळाली नसल्यामुळे राज्य शासनाला एकरकमी मदत देणे जड जात आहे. केंद्र सरकारने अडचणीतील शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत दिल्यास सर्व शेतकऱ्यांना एकाचवेळी मदतीचे वाटप होऊन खरीप हंगामासाठी त्या रकमेचा हातभार लागू शकतो.

टॅग्स :Farmerशेतकरी