एटापल्ली तालुक्याच्या जारावंडी परिसरातील कुरुमवाडा, शिरपूर, भापडा, सोहगाव, दिंडवी, दोलंदा, कसूरवाही सहित परिसरात सुरुवातीला समाधानकारक पाऊस पडल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची राेवणी केली, परंतु मागील दहा ते बारा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने काही शेतकऱ्यांची धान राेवणी खाेळंबली आहे, तसेच राेवणी झालेली पिके करपण्याचा धाेका आहे. सध्या पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्याची धडपड सुरू आहे. काही शेतकऱ्यांनी पिकाला ओढ्यातील पाणी सिंचनाद्वारे देण्याचे सुरू केले आहे. कधी ओला दुष्काळ, तर कधी काेरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टीमुळे महापूर अशा अनेक समस्यांचा शेतकऱ्याला सामना करावा लागतो. अशातच पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहे. येत्या तीन-चार दिवसांत पाऊस पडला नाही, तर संपूर्ण पिके करपून नष्ट हाेण्याची शक्यता आहे.
पंधरवड्यापासून पावसाची दडी, शेतकरी चिंताग्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:35 IST