सिरोंचात दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:42 IST2021-07-14T04:42:05+5:302021-07-14T04:42:05+5:30
सिरोंचा : सिरोंचा शहरातील शेतकऱ्यांसह सर्व नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांसह ...

सिरोंचात दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर दमदार पाऊस
सिरोंचा : सिरोंचा शहरातील शेतकऱ्यांसह सर्व नागरिक पावसाच्या प्रतीक्षेत होते. दहा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर रविवारी झालेल्या दमदार पावसाने शेतकऱ्यांसह सर्वच जण सुखावले. सिरोंचात १ जुलै राेजी चांगला दमदार पाऊस झाला होता. त्यानंतर ११ जुलैला दुपारी ३:३० ते ४:३० दरम्यान चांगला दमदार पाऊस पडला.
दोन दिवसांपूर्वी पाऊस पडण्याचा अंदाज होता. ढगाळ वातावरण व गडगडाटासह पावसाची रिपचिप सुरू होती. परंतु चांगला पाऊस झाला नव्हता. आज तासभर चांगला पाऊस बरसला. तालुक्यातील बहुतांश गावात १ जुलैनंतर चांगला पाऊस झाला नव्हता. शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते. ज्यांच्याकडे बोअरवेल पाण्याची व्यवस्था आहे अशा शेतकऱ्यांची शेतीची कामे व्यवस्थित पार पडतात. तालुक्यात धान पिकासह कापसाची मोठ्या प्रमाणात शेती करतात. कापूस पेरणी केलेले शेतकरीही पावसाच्या प्रतीक्षेत होते. गेले दोन-तीन दिवस उन्ह तापत होते. उन्हाळा की पावसाळा असे वाटत होते. कापसाच्या रोपट्यांना पावसाची नितांत आवश्यकता होती. दमदार पावसाने शेतकरी सुखावला आहे.