जिल्हाभरात गारपिटीसह जोरदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 06:00 IST2020-03-21T06:00:00+5:302020-03-21T06:00:34+5:30

धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती आहे. धानोरा तालुक्यात ५.४५ वाजताच्या सुमारास वादळासह जोरदार पाऊस व गाराही बरसल्या. धानोरा शहरातील बाजारपेठेत व बसस्थानक परिसरात पावसामुळे एकच धांदल उडाली.

Heavy rain with thunderstorms throughout the district | जिल्हाभरात गारपिटीसह जोरदार पाऊस

जिल्हाभरात गारपिटीसह जोरदार पाऊस

ठळक मुद्देबाजारपेठेत उडाली धांदल : रस्त्यावर चिखल आणि पाण्याचे डबके

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अचानक वातावरणात बदल होऊन सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास गडचिरोली, धानोरा, देसाईगंज तालुक्यात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस झाला. विशेष म्हणजे गारपीटीने नुकसान झाले.
सायंकाळी ५.४५ वाजतापासून ६.२० पर्यंत पाऊस बरसला. सुरूवातीला २० मिनीट मेघगर्जनेसह पाऊस बरसला. त्यानंतर गारपीट झाली. जवळपास १० मिनिट गारा पडल्या. त्यानंतर पुन्हा १० मिनिट पाऊस झाला. या पावसामुळे गडचिरोली शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर डबके साचले होते. स्थानिक इंदिरा गांधी चौक ते त्रिमूर्ती चौकातील बाजारपेठेत वस्तू खरेदी करण्यासाठी आलेल्या नागरिकांची धांदल उडाली.
धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी झाडे कोसळल्याची माहिती आहे. धानोरा तालुक्यात ५.४५ वाजताच्या सुमारास वादळासह जोरदार पाऊस व गाराही बरसल्या. धानोरा शहरातील बाजारपेठेत व बसस्थानक परिसरात पावसामुळे एकच धांदल उडाली.
देसाईगंज शहरासह तालुक्यातील काही गावांना शुक्रवारी रात्री अवकाळी पाऊस व गारपीटीने झोडपून काढले. मोहटोला, किन्हाळा परिसरात चांगलीच गारपीट झाली. तालुक्यात भाजीपाला पिकाची लागवड केली जाते. गारपीटीमुळे भाजीपाला पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.

Web Title: Heavy rain with thunderstorms throughout the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस