गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे दाणादाण; २४ तासात १६८ मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 11:56 IST2019-08-13T11:56:02+5:302019-08-13T11:56:38+5:30
मंगळवारी मध्यरात्रीपासून गडचिरोलीत संततधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे.

गडचिरोलीत मुसळधार पावसामुळे दाणादाण; २४ तासात १६८ मि.मी. पाऊस
ठळक मुद्देशाळांना दिली सुटी
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: मंगळवारी मध्यरात्रीपासून गडचिरोलीत संततधार पावसाने लावलेल्या हजेरीमुळे जनजीवन विस्कळित झाले आहे. मुसळधार पाऊस सुरू असल्याने सर्व शाळांना सुटी देण्यात आली आहे. शेतीची कामे व बाजारपेठा बंद झाल्या आहेत. गेल्या २४ तासात गडचिरोली जिल्ह्यात १६८ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील धानोरा, सिरोंचा, मूलचेरा, कुरखेडा, अहेरी, आरमोरी आदी तालुक्यांमध्येही जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. ताज्या घडामोडींसह सविस्तर वृत्त लवकरच देत आहोत.