गडचिरोलीत संततधार; १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2019 13:20 IST2019-08-02T13:19:06+5:302019-08-02T13:20:16+5:30

शनिवारपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोलीतील सुमारे १०० गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. हेमलकसा-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीवर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.

heavy rain in Gadchiroli district | गडचिरोलीत संततधार; १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

गडचिरोलीत संततधार; १०० हून अधिक गावांचा संपर्क तुटला

ठळक मुद्देबाजारपेठा, शाळा प्रभावितजनजीवन अस्तव्यस्त

रमेश मार्गोनवार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: शनिवारपासून सुरू असलेल्या संततधारेमुळे गडचिरोलीतील सुमारे १०० गावांचा जगाशी संपर्क तुटला आहे. हेमलकसा-भामरागड मार्गावर पर्लकोटा नदीवर पूल पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ठप्प झाली आहे.
भामरागड तालुक्याशी संपर्क ठेवता येणारा एकमेव पूल पाण्याखाली गेल्याने किमान १०० गावांचा संपर्क तुटला आहे. संततधारेमुळे शाळा, महाविद्यालयांसह बाजारपेठाही प्रभावित झाल्या आहेत. गावकऱ्यांना घराबाहेर पडणे अवघड झाले असून, शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: heavy rain in Gadchiroli district

टॅग्स :Rainपाऊस