गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 10:41 IST2018-12-17T10:40:20+5:302018-12-17T10:41:11+5:30
सोमवारी पहाटेपासून गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे.

गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले
ठळक मुद्देधान पिकाचे अतोनात नुकसान
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: सोमवारी पहाटेपासून गडचिरोली जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपले आहे. भामरागड, अहेरी, आलापल्ली, सिरोंचा आदी भागात सोमवार मध्यरात्रीपासूनच रिमझिम व नंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे धान पिकाला जबरदस्त फटका बसला आहे. विक्रीसाठी आणलेल्या धानावर त्याचा अनिष्ट परिणाम झालेला आहे. तसेच हवेत गारठा वाढल्यानेही अन्य पिकांवरही त्याचा प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.