एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश

By संजय तिपाले | Updated: September 17, 2025 16:37 IST2025-09-17T16:36:34+5:302025-09-17T16:37:10+5:30

शस्त्रसाठा जप्त : सी -६० जवान व केंद्रीय राखीव पोलिस दलाची कारवाई

Heavy encounter between police and Naxalites in Etapalli forest, two female Maoists killed | एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश

Heavy encounter between police and Naxalites in Etapalli forest, two female Maoists killed

गडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील गट्टा जांबिया पोलिस ठाणे हद्दीतील मोडस्के जंगल परिसरात झालेल्या चकमकीत दोन महिला नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना १७ सप्टेंबर रोजी यश आले आहे. घटनास्थळावरून ए-४७ रायफल, अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारुगोळा व माओवादी साहित्य मोठ्या प्रमाणावर जप्त करण्यात आले आहे. या चकमकीमुळे  माओवादी संघटनांना मोठा धक्का बसला आहे.

मोडस्के जंगल परिसरात काही माओवादी दडून बसल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, अहेरी येथून अपर अधीक्षक  सत्यसाई कार्तिक यांच्या नेतृत्वात सी-६० जवान १७ रोजी सकाळी सात वाजता रवाना केले होते, केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या १९१ बटालियनची कंपनी व गट्टा जांबिया ठाण्यातील पथकाच्या मदतीने सी- ६० जवानांनी संपूर्ण जंगलाला वेढा टाकून  १ नक्षलविरोधी अभियान सुरु केले.  

मृत माओवाद्यांची ओळख पटविणे सुरु

या अभियानादरम्यान माओवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार केला, यास जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.  चकमकीनंतर परिसरात घेण्यात आलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये दोन महिला नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले. त्यांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, ते गट्टा दलमशी संबंधित असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

घटनास्थळी काय आढळले ?

घटनास्थळावरून पोलिसांनी एक ए-४७ रायफल, एक अत्याधुनिक पिस्तूल, जिवंत दारुगोळा तसेच माओवादी साहित्य जप्त केले आहे. या धडक कारवाईमुळे नक्षलवाद्यांची कंबर मोडली असून, जवानांचे अभियान अजूनही सुरू आहे, असे पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी सांगितले.

Web Title: Heavy encounter between police and Naxalites in Etapalli forest, two female Maoists killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.