शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

गॅस तुटवड्याने जिल्हाभरातील ग्राहक हैराण

By admin | Updated: February 21, 2017 00:44 IST

जिल्हाभरातील भारत गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने या एजन्सीचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे.

भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांच्या रांगा : नागपूर येथील प्लान्टमध्ये लिक्विडचा तुटवडागडचिरोली : जिल्हाभरातील भारत गॅस एजन्सीमध्ये सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला असल्याने या एजन्सीचे ग्राहक कमालीचे त्रस्त झाले आहे. मागील आठ दिवसांपासून गॅसचे वाटप ठप्प पडल्याने सोमवारी सकाळपासून गडचिरोली येथील भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची फार मोठी रांग लागली होती. सकाळपासून रांगेमध्ये लागलेल्या ग्राहकांना दुपारी १२ वाजता संपूर्ण सिलिंडर संपल्याने खाली हातानेच परतावे लागले. गॅस सिलिंडरमध्ये लिक्वीड भरण्याचा प्लॅन्ट नागपूर येथे आहे. येथूनच संपूर्ण विदर्भात सिलिंडर भरून पाठविले जातात. मात्र मागील काही दिवसांपासून नागपूर येथील प्लॅन्टमध्ये गॅस लिक्वीडचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे एजन्सीधारकांना मागील तीन महिन्यांपासून पुरेसे सिलिंडर मिळण्यास अडचण जात आहे. गडचिरोली शहरात भारत गॅस एजन्सीचे जवळपास पाच हजार ग्राहक आहेत. दरदिवशी ७० ते ८० सिलिंडरची विक्री होते. मात्र मागील दोन महिन्यांपासून सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने सिलिंडर विक्री थांबविण्यात आली होती. सोमवारी सकाळीच सिलिंडर भरलेले वाहन गडचिरोलीत दाखल झाले. त्यामुळे सिलिंडर खरेदी करण्यासाठी भारत गॅस एजन्सीसमोर ग्राहकांची फार मोठी रांग लागली होती. काही ग्राहकांना तर १५ दिवसांपूर्वीच गॅस बुकींग करूनही गॅस मिळाली नव्हती. सकाळपासून दुपारी १२ वाजेपर्यंत ग्राहक जुना सिलिंडर धरून रांगेमध्ये लागले होते. मात्र १२ वाजताच्या सुमारास संपूर्ण सिलिंडर संपले. त्यानंतर गोदामामध्ये २० सिलिंडर होते. मात्र तेही सिलिंडर काही वेळताच संपले. त्यामुळे ७० पेक्षा अधिक ग्राहकांना परत जावे लागले. हीच परिस्थिती जिल्हाभरातील इतरही भारत गॅस एजन्सीमध्ये आहे. त्यामुळे भारत गॅस एजन्सीचे ग्राहक कमालीचे त्रस्त आहेत. ग्रामीण भागातील बहुतांश नागरिकांकडे एकच सिलिंडर उपलब्ध आहे. त्यामुळे या ग्राहकांना दुसरे सिलिंडर उपलब्ध न झाल्यास त्यांना चुलीवर स्वंयपाक केल्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा प्रश्न तत्काळ निकाली काढावा, अशी मागणी होत आहे.बीपीएलधारक नागरिकांना शासनाच्या वतीने तसेच वन विभागाच्या मार्फतीनेही ग्रामीण भागातील नागरिकांना गॅसचे वितरण करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास सर्वच नागरिकांच्या घरी गॅस आहे. त्यामुळे गॅस तुटवड्याचा फटका शहरी भागातील महिलांसह ग्रामीण भागातील महिलांनाही बसला असल्याचे दिसून येत आहे. (प्रतिनिधी)आणखी महिनाभर कायम राहणार परिस्थितीनागपूर येथील गॅस रिफिल करण्याच्या प्लान्टमध्ये लिक्विडचा तुटवडा निर्माण झाला आहे. सदर तुटवडा मागील दोन ते तीन महिन्यांपासून निर्माण झाला आहे. मात्र लिक्विडचा तुटवडा इतर गॅस एजन्सीला न निर्माण होता, भारत गॅस एजन्सीलाच का निर्माण झाला, याचे तांत्रिक कारण गडचिरोली जिल्ह्यातील गॅस एजन्सीधारकांना माहित नाही. मात्र आणखी १५ दिवस ते एक महिना गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गडचिरोलीसह नागपूर, चंद्रपूर व विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे त्याही जिल्ह्यामध्ये गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांच्या मोठमोठ्या रांगा लागत असल्याचे दिसून येत आहे. सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाल्याने मागील १५ दिवसांपासून शहरात घरपोच सिलिंडर सुविधा बंद करण्यात आली आहे.